सौजन्य - नवराष्ट्र टीम
दुधाने म्हणाले, नागरिकांना कोणतीही पूर्वसूचना न देता तसेच विश्वासात न घेता बेकायदेशीर सर्वेक्षण करण्यात येत होते. यावेळी अधिकारी वर्ग पोलीसांसह उपस्थित असल्याने नागरिकांमध्ये भीती आणि रागाच्या संमिश्र भावना दिसून आल्या. यावेळी नागरिकांचा रोष ध्यानात घेता अधिकारी वर्गाने काढता पाय घेतला असला तरी नागरिकांतील असंतोष कमी झालेला नाही.
याबद्दल आज झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण पुणे क्षेत्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीशकुमार खडके आणि त्यांच्या अखत्यारीत कार्यरत असणाऱ्या उपजिल्हाधिकारी तथा सक्षम प्राधिकारी अधिकारी अर्चना यादव यांची भेट घेतली आणि सदर प्रश्नावर सविस्तर चर्चा केली. याप्रसंगी नागरिक सदर ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्यास असून, त्यांचा सदर उपक्रमास विरोध आहे. यामुळे नागरिकांचे हक्क आणि भविष्य सुरक्षित राखण्यासाठी नागरिकांच्या संपूर्ण संमतीविना कोणतीही कार्यवाही केली जाऊ नये, अशी मागणी दुधाने यांनी केली आहे.
यावर सकारात्मक विचार न झाल्यास प्रशासनाला नागरिकांच्या रोषास सामोरे जावे लागेल, असा इशाराही दुधाने यांनी दिला. याप्रसंगी अधिकाऱ्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला असून, प्रशासन यावर योग्य ती कार्यवाही करेल, असा विश्वास वाटतो. नागरिकांच्या या लढाईत आम्ही त्यांच्यासोबत असून त्यांच्या हक्कांसाठी सदैव कटिबद्ध असू, यात शंकाच नाही, असंही दुधाने यावेळी म्हणाले.






