देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट
नवी दिल्ली: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे भेट घेत, त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. राज्य सरकारने गडचिरोलीत पोलाद क्षेत्रात मोठा पुढाकार घेतला असून, गडचिरोली आता देशाची स्टीलसिटी म्हणून विकसित होत आहे. यादृष्टीने गडचिरोलीला माईनिंग हब म्हणून विकसित करण्यासाठी केंद्राने सहकार्य करावे, असे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
नागपूर विमानतळाच्या कामाला सुद्धा गती देण्यात आली असून, त्यात केंद्र सरकारसंदर्भातील काही विषयांबाबत सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी चर्चा केली. यामुळे विमानतळ कामातील अडसर आता लवकरच दूर होतील. स्थानिक स्वराज्य संस्थांना १५ व्या वित्त आयोगाचा निधी लवकरात लवकर मिळावा, असाही एक विषय या चर्चेत होता. या सर्व बाबतीत सकारात्मक प्रतिसाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींशी भेट; राज्याच्या महत्त्वाच्या प्रकल्पांबाबत चर्चा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन गडचिरोली माईनिंग हब, नागपूर विमानतळ विकास आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या… https://t.co/Bk5GAhHgFH
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 13, 2025
वर्ल्ड ऑडिओ, व्हीज्युअल अँड एन्टरटेंटमेंट समिट आयोजित करण्याची संधी महाराष्ट्राला दिल्याबद्दल या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. १ ते ४ मे या कालावधीत मुंबईत ही समिट होणार आहे. याचनिमित्ताने मुंबईत आयआयटीच्या धर्तीवर आयआयसीटी (इंडियन इन्स्टिट्युट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी) सुद्धा स्थापन करण्यात येणार असून, त्यासाठी सुद्धा केंद्र सरकार निधी देणार आहे, त्याबद्दलही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.
नक्षलवादाविरोधात ‘देवाभाऊ’ ॲक्शन मोडमध्ये
राज्यात मागील वर्षी विधानसभा निवडणूक पार पडली. राज्यात जनतेने महायुतीला स्पष्ट बहुमत दिले. महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रीमंडळाचा विस्तार झाला. खातेवाटप झाले. मात्र पालकमंत्रीपदाचे वाटप कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. राजकीय नेत्यांमध्ये अनेक दिवसांपासून पालकमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरु होती. शेवटी हा तिढा राज्य सरकारने सोडवला आहे. राज्यातील फडणवीस सरकारने अखेर राज्यातील पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली आहे. पालकमंत्रीपदाबाबत देवेंद्र फडणवीस यांची देखील इच्छा पूर्ण झालेली पाहायला मिळत आहे.
काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी त्यांना पालकमंत्रिपदाच्या वाटपाबाबत प्रश्न विचारण्यात आले. तसेच त्यांना कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री हवे असल्याचा प्रश्न देखील विचारण्यात आला होता. ‘खरंतर मुख्यमंत्री कोणत्याही जिल्ह्याचं पालकत्व घेत नसतात. पण गडचिरोलीचं पालकमंत्रीपद घ्यावं अशी माझी इच्छा आहे. अर्थात दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली तरच घेईन’, असे उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते.