'ही' आहे Anand Mahindra ची आवडती कार
महिंद्रा बोलेरो या 25 वर्षांपासून भारतीय रस्त्यांवर राज्य करणाऱ्या कारला कंपनीने पुन्हा एकदा एका नवीन अवतारात लाँच केल्याने याची वेगळीच चर्चा रंगली आहे. Mahindra & Mahindra यांनी अलीकडेच बोलेरो 2025 आणि Bolero Neo 2025 ची नवीन श्रेणी लाँच केली. या प्रसंगी कंपनीचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (ट्विटर) वर त्यांच्या आठवणी शेअर केल्या. त्यांनी लिहिले, “जर मला स्वतः चालवण्यासाठी कार निवडावी लागली, तर ती बोलेरोच असेल.”
खरं तर, आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या बोलेरोला प्रेमाने “Black Beast” असे टोपणनाव दिल्याचे उघड केले. त्यांच्या मते, बोलेरोची ताकद, साधेपणा आणि विश्वासार्ह कामगिरी यामुळे ती खऱ्या अर्थाने ‘ओल्ड स्कूल रोड वॉरियर’ बनते.
‘या’ शेतकऱ्याचा रुबाबाच भारी! तब्बल 1.5 कोटींच्या कारची डिलिव्हरी घ्यायला पोहोचला बैलगाडीतून!
आनंद महिंद्रांचे बोलेरोसोबतचे नाते हे 1990 च्या दशकापासूनचे आहे. त्यांनी सांगितले की, कंपनीची पहिली हार्ड-टॉप SUV Mahindra Armada बाजारात आली त्या काळापासून त्यांनी कधीही इतर कोणत्याही ब्रँडची कार वापरलेली नाही. त्यापूर्वी त्यांच्या गॅरेजमध्ये Hindustan Motors ची Contessa होती.
ते पुढे म्हणाले, “आज मी जरी अत्याधुनिक XEV 9e इलेक्ट्रिक SUV वापरत असलो, तरी कार चालवण्यासाठी माझी पहिली पसंती नेहमीच Bolero राहील.” आनंद महिंद्रांनी सांगितले की, Scorpio लाँच होण्यापूर्वी ते बोलेरो मोठ्या उत्साहाने चालवत असत आणि आता जेव्हा या SUV चे 2025 वर्जन बाजारात आले आहे, तेव्हा त्यांना वाटते की “The Beast is Back!”
बोलेरो ही भारतातील अशा काही मोजक्या कारपैकी एक आहे ज्यांचे उत्पादन सतत सुरू आहे. आनंद महिंद्रा यांच्या मते, Maruti Wagon R नंतर, ही भारतातील सर्वात जुनी कार ब्रँड आहे जी अजूनही विक्रीसाठी उपलब्ध आहे. 2000 मध्ये लाँच झालेल्या बोलेरो मारुती अल्टोच्या फक्त एक महिना आधी आली. या 25 वर्षांत, बोलेरोने ग्रामीण आणि शहरी दोन्ही भारतीय बाजारपेठांमध्ये एक मजबूत वर्चस्व प्रस्थापित केली आहे.
1 लाखाचं डाउन पेमेंट आणि देशातील सर्वात स्वस्त कारची चावी तुमच्या हातात असेल, EMI 5000 पेक्षा कमी
नवीन महिंद्रा बोलेरो 2025 ला पारंपरिक लूक कायम ठेवत एकदम आधुनिक डिझाइन देण्यात आले आहे. यात नवीन फ्रंट ग्रिल, क्रोम इन्सर्ट्स, अपडेटेड बंपर आणि 15-इंच ड्युअल-टोन अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत. इंटिरिअरबाबत बोलायचं झालं तर, आता यात 7-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, लेदरेट सीट्स, आणि स्टीयरिंग-माउंटेड कंट्रोल्स मिळतात, ज्यामुळे ड्रायव्हिंग अनुभव आणखीनच आरामदायी झाला आहे.
तर दुसरीकडे, Bolero Neo 2025 मध्ये आणखीन प्रगत फीचर्स देण्यात आले आहेत, जसे की 9-इंच टचस्क्रीन डिस्प्ले, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, आणि अधिक आरामदायी व एर्गोनॉमिक सीट्स, ज्यामुळे या SUV चा संपूर्ण लुक आणि फील अधिक प्रीमियम झाला आहे.