'उद्योजकांच्या घराखाली बॉम्ब कोणी ठेवला?'; एकनाथ शिंदे यांनी थेट नावच सांगून टाकलं
विदेशात जावून देशाची बदनामी केली जाते. हनुमान चालिसा म्हणणाऱ्यांना जेलमध्ये टाकलं. पत्रकारांनाही सोडलं नाही. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांनाही जेलमध्ये टाकलं. सर्वात गंभीर बाब म्हणजे उद्योजकांच्या घराच्या बाहेर बॉम्ब ठेवणारे कोण? तर हे महाराष्ट्रद्रोही असल्याचा गंभीर आरोप एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर केला आहे. बळीराम शिरस्कार यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते.
हेही वाचा-राज ठाकरेंची सत्ताही कधी येणार नाही…; भाजपच्या मित्रपक्षाने व्यक्त केली राजकीय भविष्यवाणी
शेतकरी सन्मान योजना जी १२ हजार होती ती १५ हजार करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी दिली. २५ लाख रोजगार देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. अंगणवाडी सेविकांना १५००० रुपये देण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. शेतकऱ्यांसाठी वीजमाफी केली. ३० टक्के बिलात कमी करण्यात येणार आहे. मात्र आता जी महाविकास आघाडी पैसे कुठून आणणार असा आरोप करीत होती, तेच आता महायुतीच्या योजनांची कॉपी करत असल्याचा टोला शिंदेंनी लगावला.
महाविकास आघाडी सरकारच्या काळातील मुख्यमंत्री घरी बसले होते. घरी बसून काम करत होते. घरी बसून जनतेची कामं होत नाहीत, तर लोकांमध्ये जावं लागतं. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, त्यामुळेच शेतकऱ्यांच्या बांधावर जातो, लोकांमध्ये मिसळतो, असा टोला त्यांनी एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता लगावला आहे.
प्रकल्प गुजरातला पळवले म्हणून आकांडतांडव करणाऱ्या महाविकास आघाडीच्या काळात महाराष्ट्र तीसऱ्या नंबरवर घसरला होता. आज कित्येक लाख कोटींची गुंतवणूक मुंबई आणि महाराष्ट्रात झाली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. लाडकी बहीण बंद व्हावी म्हणून महाविकास आघाडीचे नेते कोर्टात गेले. पण कोर्टाने त्यांना चागंलीच चपराक लगावली. लोक कल्याणकारी योजना असल्यामुळे कोर्टाने हस्तक्षेप करण्यास नकार दिला. हा चुनानी जुमला आहे. असंही म्हणत होते. मात्र आता आम्ही लाडक्या बहिणींना २१०० रुपये देणार आहोत, असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं.
हेही वाचा-एक देवाभाऊ एक दाढी भाऊ अन् तिसरा जॅकेट भाऊ, सगळे मिळून महाराष्ट्र खाऊ; उद्धव ठाकरेंची तुफान टोलेबाजी
विरोधकांना लाडक्या बहिणीचं दुःख माहिती नाही. तरीही ते म्हणातात त्यांच सरकार आलं की, सर्व योजनांची चौकशी लावू. या पोकळ धमक्यांना महायुती घाबरत नसल्याचं नाही. लाडक्या बहिणीसाठी एकनाथ शिंदे जेलमध्येटटही जायला तयार असल्याचं त्यांनी ठणकावून सांगितलं.
दोन वर्षांपूर्वी मी उठाव केला आणि नवीन सरकार आणलं. ज्या ठाकरे गटाने आमचा धनुष्यबाण गहाण ठेवला होता तो आम्ही सोडवून आणला. राजा का बेटा राजा नही बनेगा, जो काम करेगा वही राजा बनेगा, असा टोलाही शिंदे यांनी लगावला आहे. शिवसेना चोरली असं लहान मुलासारखं म्हणतात. मग मी शिवसेना चोरतांना तुम्ही झोपला होता का? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला. सत्ता सोडून आम्ही बाहेर पडलो, जिथे बुक्यांचा मार सहन करावा लागला तिथे थांबणे तुम्हाला मान्य आहे का? असा सवालही त्यांनी यावेळी केला.