मुंबई : आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) जीवे मारण्याची धमकी आली आहे. त्यामुळं प्रशासन खडबडून जागे झाले आहे, तसेच धमकीचा फोन कुठून आला याचा पोलीस शोध घेताहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याचा धमकीचा निनावी फोन आला आहे. (Death threats phone call) स्फोट घडवून जीवे मारण्याची धमकी शिंदेंना देण्याती आली आहे. यामुळं ठाण्यातील घरी व वर्षा शासकीय निवासस्थानी सुरक्षा वाढवली आहे. या धमकीची गुप्तचर विभागाला मिळाली माहिती आहे. धमकीचा निनावी फोन कोणी केला याचा पोलीस शोध घेताहेत.
[read_also content=”मुख्यमंत्र्यांची सुरक्षा अधिक कडेकोट करा, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रशासनाला आदेश https://www.navarashtra.com/maharashtra/cm-eknath-shinde-security-strict-and-tight-devendra-fadnvis-332194.html”]
दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या धमकीनंतर आता यावर राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया समोर येत आहेत, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnvis) यांनी मुख्यमंत्र्यांची सुरक्षा यंत्रणा कडेकोट करण्याचे आदेश प्रशासनाला दिल्यानंतर आता भाजपा आमदार प्रवीण दरेकरांनी (pravin darekar) या धमकीचा संबंध थेट हिंदूविरोधी लोकांशी जोडला आहे. हिंदूविरोधी प्रवृत्ती डोकं वर काढत आहेत, शिंदे-फडणवीस सरकारमध्ये हिंदूविरोधी कारवाया करणाऱ्या विरोधात मुख्यमंत्र्यांनी ठोस भूमिका घेतली आहे, त्यामुळं यातूनच मुख्यमंत्र्यांच्या धमकी आली आहे, असं प्रवीण दरेकरांनी प्रतिक्रिया दिली आहे.