रोहन सुरवसे पाटील यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार (फोटो- टीम नवराष्ट्र)
पुणे: पुरंदर विधानसभेचे शिवसेना महायुतीचे उमेदवार माजी मंत्री विजय शिवतारे यांनी आचार संहितेचा भंग केल्याचा दावा महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी केला आहे. फुरसुंगी येथील ‘रॉयल स्टे ईन लॉजिंग’ या लॉजवर शिवतारे यांनी निवडणूक प्रचारासाठी हवेत ‘एअर बलून’ बांधला आहे. ज्यावर शिवसेना पक्ष चिन्ह धनुष्यबाण तसेच विजय शिवतारे शिवतारे यांच्या संदर्भातील प्रचाराचा मजकूर आहे. आचार संहितेच्या काळात बॅनर लावणे तसेच होर्डिंग लावणे यावर राजकीय पक्षांना तसेच उमेदवारांना प्रतिबंध आहे. त्यामुळे या संदर्भातील व्हिडीओ तसेच फोटोही सुरवसे पाटील यांनी प्रसारित केला आहे. त्यामुळे निवडणूक आयोग यावर काय कारवाई करणार असा सवाल सुरवसे पाटील यांनी उपस्थित केला आहे.
पुरंदर विमानतळावरून विजय शिवतारे यांची विरोधकांवर टीका
विमानतळ प्रकल्पामुळे पुरंदरची संपूर्ण जगात ओळख निर्माण होणार आहे प्रकल्प झाल्यानंतर हजारो युवक, युवतींना रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. भविष्यात पुरंदरच्या युवकांना इतरांवर अवलंबून राहण्याची वेळ येणार नाही. काही लोकांना स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी त्यामध्ये आडकाठी आणली जात आहे. त्यांना विकास महत्वाचा नाही तर स्वतःची दुकानदारी चालू ठेवण्यासाठी प्रकल्पांना विरोध केला जात आहे. महायुतीचे सरकार आल्यास शेतकऱ्यांना जास्तीत जास्त चांगला मोबदला देवून प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करून येईल.
शिवतारे यांची अजित पवारांवर टीका
राज्यात शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी कॉंंग्रेसची महायुती आहे. महायुतीचे अधिकृत तिकीट मला देण्यात आले आहे. केंद्रात सरकार महायुतीचे असताना महायुतीचे सरकार येणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे मला ताकद देण्याऐवजी लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांना पाडण्यासाठी प्रचंड ताकद लावली, पैसे लावले त्यांनाच उमेदवारी दिली जात असेल तर दुर्दैवी असून संभाजीराव झेडे यांचा महायुतीशी काय संबंध आहे ? अजित पवार यांच्या प्रतिकूल परिस्थितीत ज्यांनी साथ दिली, अशा डॉ. दिगंबर दुर्गाडे यांना तिकीट दिले असते तर मी समजू शकलो असतो. आपण शब्द दिलेले असताना पुन्हा पाळत नसताल तर तुमची विश्वासार्हता काय ? अशा शब्दात महायुतीतील शिवसेनेचे उमेदवार विजय शिवतारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली.
हेही वाचा: दिलेला शब्द पाळत नसाल तर…; विजय शिवतारेंचा अजित पवारांवर संताप