दिल्ली : कोरोना रुग्णांची (Corona Alert) संख्या पुन्हा वाढायला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. (Maharashtra Corona Cases) या वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य सचिवांनी महाराष्ट्राच्या आरोग्य सचिवांना पत्र (Central Government Letter To State Government ) लिहिलं आहे.
[read_also content=”ऑगस्टच्या पहिल्या रविवारीच का साजरा करतात फ्रेंडशिप डे, जाणून घ्या https://www.navarashtra.com/lifestyle/find-out-why-friendship-day-is-celebrated-on-the-first-sunday-of-august-nrrd-312735.html”]
महाराष्ट्रात आठवड्याला कोरोना चाचणीचे प्रमाण काही जिल्ह्यात कमी झाले आहे. तसेच काही जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत आहे आणि काही जिल्हयांमध्ये १० टक्क्यांपेक्षा अधिक पाॅझिटिव्हिटी रेट आहे. या जिल्ह्यांची माहिती केंद्रीय आरोग्य सचिवांनी राज्याच्या आरोग्य सचिवांना पत्र लिहित दिली आहे.
आगामी काळात येणाऱ्या सणांमध्ये गर्दी वाढू शकते. त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन केंद्रीय आरोग्य सचिवांकडून करण्यात आलं आहे. रुग्णसंख्या जास्त असलेल्या जिल्ह्यांवर नजर ठेवत उपाययोजना करा, पॉझिटिव्हिटी रेट आणि संसर्ग न वाढू देण्यासाठी प्रयत्न करा आणि केस मॅनेजमेंट करा, असंही त्यांनी सांगितलं आहे.
याशिवाय राज्यातील १८ वर्षांवरील लोकांच्या लसीकरणाचा वेग वाढवा, असं आवाहन केंद्रीय आरोग्य सचिवांनी केलं आहे. महाराष्ट्रात गेल्या एका महिन्यात २१३५ सरासरी रुग्णसंख्या प्रति दिवस नोंदवली जात आहे. महाराष्ट्रात ५ ऑगस्ट रोजी १८६२ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.
आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात दिवसभरात कोरोनाची लागण झालेल्या १९ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. देशात शुक्रवारी दिवसभरात १९,४०६ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात ४९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.