अकोला : मालगाडीचं इंजिन जर डब्यांपासून वेगळं झालं तर… हे फक्त कल्पना करुन अंगावर काटा येतो मात्र अशी काहीशी घटना अकोल्यात घडली आहे. काळ आला पण वेळ आली नाही अशी घटना अमरावतीमध्ये घडल्याचं पहायला मिळत आहे. मालगाडीचे डब्बे एकीकडे तर इंजिन दुसरीकडे त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता जास्त होती. मात्र पायलटच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला आहे.
अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू रेल्वे स्थानकाजवळ शनिवारी हा प्रकार घडला. या सगळ्या घटनेवर रेल्वेप्रशासन आणि प्रवशांमध्ये देखील चिंता व्यक्त केली जात आहे. सर्वासामान्य माणसांसाठी रेल्वे प्रवास हा अत्यंत सुखकर असल्याचं म्हटलं जातं. मात्र अकोल्यातील मालगाडीसारख्या दुर्घटनेमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येत असल्याचं दिसून येतं. ही मालगाडी नागपूरकडून मुंबईकच्या दिशेने रवाना होत होती. मात्र मालगाडीचे कपलिंग अचानक तुटल्याने गाडीचे दोन भाग झाले. त्यामुळे इंजिनजवळील काही डबे पुढे निघून गेले तर काही मागच्या बाजूचे डबे तसेच राहिले. त्यामुळे रेल्वेचा मोठा अपघात होण्याची शक्यता जास्त होती. मात्र रेल्वे पायलटने प्रसंगावधान राखत हाताबाहेर जाणारी परिस्थिती नियंत्रणात आणली आणि पुढे होणारी दुर्घटना त्यामुळे टळली आहे.
हा सगळा घटनाक्रम घडला ते बोरगाव मंजू रेल्वेस्थानकाच्या काही अंतचरावरुन. घटनेची तीव्रता लक्षात घेत रेल्वे कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि विस्कळीत झालेले डबे स्थिर केले. यामुळे नागपूरवरुन मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मेलगाड्यांवर देखील याचा परिणाम दिसून आला. दैव बलवत्तर म्हणून या सगळ्यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. भविष्यात अशा घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी रेल्वेप्रशासनाने ठोस पावलं उचलावीत अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.