मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचे ज्येष्ठ पुत्र सलील देशमुख (Salil Deshmukh) यांना मुंबई सत्र न्यायालयाने (Mumbai Session Court) तात्पुरता दिलासा दिला आहे. त्यांचा विनंती अर्ज मान्य करत न्यायालयासमोर हजर राहण्यासाठी त्यांना ४ आठवड्यांची परवानगी दिली आहे.
अनिल देशमुख यांच्याविरोधात ईडीने (ED) जो इसीआयआर (Enforcement Case Information Report) नोंदवला आहे. त्यात अनिल देशमुख यांच्यासह त्यांचे कुटुंबीय देखील आरोपी दाखवण्यात आले आहेत. यामध्ये त्यांचे ज्येष्ठ पुत्र सलील हे आरोपी क्रमांक १७ आहेत. तपास यंत्रणेने याप्रकरणी चौकशीसाठी वारंवार सलील यांना समन्स बजावले. पण ते कधीही जबाब नोंदवायला तपास यंत्रणांसमोर हजर झालेले नाहीत.
प्रकरण कोर्टात गेले तेव्हा कोर्टाने देखील त्यांना दोन वेळा कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले होते. तिसऱ्या समन्सनंतर वॉरंट निघण्याची शक्यता असल्याने त्यांनी आपल्या वकिलांमार्फत कोर्टात विनंती अर्ज सादर करत कोर्टात हजर राहण्यासाठी मुदत मागितली. कोर्टाने त्यांचा हा विनंती अर्ज मान्य करत चार आठवड्यांची मुदत दिली आहे.






