संग्रहित फोटो
देहूरोड : राहत्या घराच्या पार्किंग लगत पत्र्याच्या शेडमध्ये गाईंची कत्तल करून त्यांचे मांस विक्री करण्याच्या तयारीत असताना अटक करण्यात आलेल्या चारही आरोपींची वडगाव मावळ न्यायालयाने येरवडा कारागृहात रवानगी केली. या आधी या आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.
अनिस शेखलाल शेख, ( वय ४०, रा. साईनगर, मामुर्डी, देहूरोड), नदीम बशीर शेख ( वय- ३१), शाहरुख आरिफ कुरेशी ( वय-२५, दोघे रा. रा. दत्त मंदिर, आंबेडकर रोड, देहूरोड) आणि अंकुश मारुती आमले ( वय-५०, रा. राजीव गांधी नगर, देहूरोड), अशी अटक या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी पोलीस हवालदार निशांत वसंत ठोकळे यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आरोपी अनिस शेख याच्या साईनगर, मामुर्डी येथील राहत्या घराच्या पाठीमागे एका पत्र्याच्या शेडमध्ये शेख आणि अन्य आरोपी गाईंची कत्तल करून ते मांस रिक्षात भरून विक्री करण्यासाठी नेताना आढळून आला. तसेच त्या ठिकाणी अन्य दोन गाईंची कत्तलीसाठी तयारी केल्याचे आढळून आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळाहून आरोपी शेख आणि अन्य तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. या चारही आरोपींना वडगाव न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. ही मदत संपल्याने त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांची येरवडा कारागृहात रवानगी केली.