खांदेश्वरमध्ये सिडकोच्या भूखंडावर परवानगीशिवाय क्रिकेट ॲकॅडमी; लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
खांदेश्वर सेक्टर २५ मधील लक्ष्मी आशीर्वाद इमारतीसमोर सिडकोच्या मालकीच्या भूखंडावर अनधिकृतपणे सुरू असलेली एक क्रिकेट ॲकॅडमी सध्या स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचा विषय ठरली आहे. विशेष म्हणजे, ही FSCC Cricket Academy नावाची संस्था कोणतीही अधिकृत परवानगी अथवा राज्य क्रीडा विभागाची नोंदणी नसताना सुरू असूनही, तिथे केवळ ५ ते १० वयोगटातील मुलांना थेट लेदर बॉलने प्रशिक्षण दिलं जात असल्याचे समोर आले आहे.
मुंबई,पुणे महापालिका निवडणुका आणखी लांबणीवर पडणार; नेमकं काय आहे कारण?
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही ॲकॅडमी पूर्वी मुंबईतही अनधिकृतपणे सुरू होती. तेथील कार्यवाही टाळण्यासाठी त्यांनी आता खांदेश्वरमध्ये बोगस कागदपत्रांच्या आधारे काम सुरू केल्याचे बोलले जात आहे. प्रशिक्षणादरम्यान मुलांकडे कोणतेही सुरक्षात्मक साहित्य नसते. त्यामुळे खेळताना दुखापतीची शक्यता वाढली आहे. विशेषतः लेदर बॉल रस्त्यावर जाऊन नागरिकांना लागल्याच्या अनेक घटना घडल्या असून, त्यामुळे स्थानिक रहिवासी संतप्त झाले आहेत.
या अकॅडमीत प्रशिक्षण घेणाऱ्या मुलांच्या पालकांकडून शुल्क आकारले जात असूनही, संस्थेची कायदेशीर स्थिती अत्यंत धूसर आहे. ना सिडकोची परवानगी, ना क्रीडा विभागाची मंजुरी – त्यामुळे कायद्यासमोर ही ॲकॅडमी पूर्णपणे बेकायदेशीर ठरते. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या संस्थेने सार्वजनिक मालमत्तेचा वापर चुकीच्या पद्धतीने करत मुलांच्या जिवाशी खेळ सुरू केला आहे.
स्थानिक नागरिकांच्या प्रमुख मागण्या:
सिडकोने भूखंडावर सुरू असलेली ही अनधिकृत ॲकॅडमी तात्काळ बंद करावी.
क्रीडा विभागाने या संस्थेची सखोल चौकशी करून कारवाई करावी.
लहान मुलांच्या सुरक्षेसाठी कठोर नियम लागू करावेत आणि नियमभंग करणाऱ्यांवर शिक्षेची तरतूद करावी.
Maharashtra Elections : ऑक्टोबरमध्ये उडणार महापालिका निवडणुकांचा बार? किती टप्प्यात होणार निवडणुका?
प्रशासनाकडे मागणी: सिडको, पोलीस प्रशासन आणि क्रीडा विभागाने या प्रकाराची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि पालकांकडून केली जात आहे. केवळ बेकायदेशीर कार्यवाहीच नव्हे, तर निव्वळ लाभासाठी लहान मुलांच्या जिवाशी खेळ केला जातोय हे अधिक चिंतेचे कारण ठरत आहे. या प्रकारावर तात्काळ कारवाई झाली नाही, तर भविष्यात अपघात किंवा गंभीर घटना घडू शकतात, असा इशारा स्थानिकांनी दिला आहे.