धारावी सिलेंडरच्या स्फोटांनी हादरली; एकामागून एक स्फोट, अनेक गाड्या जळून खाक (File Photo)
मुंबई : धारावी येथे आग लागून सोमवारी रात्री मोठी दुर्घटना घडली. सिलेंडर वाहून नेणाऱ्या ट्रकला अचानक आग लागली. त्यानंतर एकामागून एक असे काही स्फोट देखील झाले. धारावीच्या पीएमजीपी कॉलनी परिसरामध्ये रस्त्यावर पार्क केलेल्या सिलेंडरच्या गाडीत अचानक आग लागली. या आगीच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. पण, अग्निशमन दलाच्या जवानांची शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली.
धारावी नेचर पार्कजवळ या सिलेंडर भरुन नेणाऱ्या ट्रकला आग लागल्याचे स्थानिक आमदार बाबूराव माने यांनी सांगितले. आतापर्यंत 12 सिलेंडरचा स्फोट झाल्याचे सांगण्यात आले. या परिसरातील नागरिकांना मैदानात हलविण्यात आले आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच तातडीने मदतकार्य सुरु करण्यात आले होते. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे. या घटनेचे धक्कादायक व्हिडिओ समोर आले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशामक दलाच्या गाड्या आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. सध्या तरी या आगीत कुठल्याची जीवितहानीची माहिती समोर आलेली नाही. पण या गाडीत मोठी वित्तहानी होण्याची शक्यता आहे. धारावी बस डेपोजवळ ही घटना घडली.
मुंबई के धारावी इलाके में एक गैस सिलेंडर से भरे ट्रक में आग लगी.
गैस सिलेंडर में लगातार धमाके हो रहे है.
फायर ब्रिगेड और पुलिस मौके पर.#Mumbai pic.twitter.com/AoPH4WNakO
— Vivek Gupta (@imvivekgupta) March 24, 2025
दरम्यान, या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी पोहचल्या. त्यांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले. या ठिकाणी ट्रकमध्ये 30 हून अधिक सिलेंडर या ट्रकमध्ये असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या गाड्यांच्या स्फोटांचे आवाज अनेक किलोमीटर परिसरात ऐकू येत असल्याने जवळ जाण्याचे टाळा, असे आवाहन करण्यात येत होते.
‘नो पार्किंग’ झोन असतानाही वाहने सर्रास पार्क
धारावीच्या या परिसरात ‘नो पार्किंग’ झोन असतानाही धोकादायकरित्या गॅस सिलेंडर भरलेल्या गाड्या पार्क करणे बेजबाबदारीचे लक्षण आहे. खासदार वर्षा गायकवाड यांनी अशा प्रकारचे धोकादायक ट्रक येथे नेहमीच येथे पार्क केले जातात. त्यामुळे ‘मुंबईकरांच्या जीवाशी हा खेळ सुरु आहे. पालिकेचे एवढे मोठे बजेट काय कामाचे?’ असा सवाल वर्षा गायकवाड यांनी केला आहे.