लोकसभा निवडणुकीचा निकाल उद्या म्हणजे ४ जूनला जाहीर होणार आहे. निकालानंतर जनेताला आशा आहे की, देशातील महागाई काही प्रमाणात कमी होईल. मात्र निकाल जाहीर होण्याच्या आधीच सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसला आहे. कारण अमूलने देशभरात दुधाच्या दरात दोन रुपयांनी वाढ केली आहे. ही दरवाढ आजपासून लागू करण्यात आली.
गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने (GCMMF) अमूल दुधाच्या दरात प्रतिलिटर 2 रुपयांनी वाढ केल्याची माहिती देणारी नोट जारी केली आहे. यामध्ये अमूल गोल्ड, अमूल ताज आणि अमूल शक्ती यांचा समावेश आहे. अमूलने ताज नाना पाऊच वगळता सर्व दुग्धजन्य पदार्थांच्या दरात प्रति लिटर २ रुपयांनी वाढ केली आहे.
Amul has increased prices of fresh pouch milk (All variants) by Rs 2 per litre, effective from June 3: Gujarat Cooperative Milk Marketing Federation Limited pic.twitter.com/lWsgtv44hx — ANI (@ANI) June 2, 2024
इतक्या रुपयांनी दुधात दरवाढ
अमूल गोल्डच्या अर्धा लिटर दुधाच्या दरात ३२ रुपयांवरून ३३ रुपयांपर्यंत वाढ झाली. अमूल ताझाची किंमत २६ रुपयांवरून २७ रुपयांपर्यंत वाढली आहे. अमूल शक्तीची किंमत 29 रुपयांवरून 30 रुपयांपर्यंत वाढली आहे. महाराष्ट्रासह देशभरात हे दर लागू होऊ शकतात. अमूलच्या दरात वाढ केल्यानंतर केवळ मदर डेअरीसारख्या कंपन्यांच्या दुधाच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही टोलच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने टोल दराबाबत मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार देशभरातील सर्व टोलनाक्यांवर ३ ते ५ टक्के अधिक टोल आकारण्यात येणार आहे. एप्रिलमध्येच ही वाढ झाली असती पण लोकसभा निवडणुकीमुळे ती पुढे ढकलण्यात आली होती.
…म्हणून दुधाच्या दरात दरवाढ
अमूलचा सभासद संघटनेने गेल्या वर्षभरात शेतकऱ्यांच्या किमतीत सुमारे ६ ते ८ टक्क्यांनी वाढ केली आहे. एका धोरणाअंतर्गत, अमूल ग्राहकांकडून दूध आणि दुग्धजन्य पदार्थांसाठी देय असलेल्या प्रत्येक रुपयाचे अंदाज 80 पैसे दूध उत्पादकांना देते. दर सुधारणेमुळे आमच्या दूध उत्पादकांसाठी दुधाचे दर टिकून राहण्यास मदत होईल. त्यांना अधिक दूध उत्पादनासाठी प्रोत्साहन अमूलन आपल्या निवदेनात म्हटलयं.






