देवेंद्र फडणवीस (फोटो- ट्विटर)
राजधानी: कर्नाटकमध्ये सध्या कॉँग्रेसचे सरकार आहे. राहुल गांधी आणि कॉँग्रेस पक्षाचे नेते सातत्याने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करत असल्याचे पाहायला मिळते. त्यातच आता कर्नाटकचे आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. यावरून आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर हे ब्राह्मण होते. मात्र ते गोमांस खायचे’ असे वादग्रस्त विधान दिनेश गुंडूराव यांनी केले आहे. दरम्यान त्यांच्या वादग्रस्त विधानाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.
एका पुतस्क प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलताना कर्नाटकचे आरोग्य मंत्री दिनेश गुंडूराव यांनी सावरकरांबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. सावरकर ब्राह्मण असून गोमांस खात होते, असा दावा गुंडूराव यांनी केला आहे. सावरकरांनी कधीही गोहत्येचा विरोध केला नाही. गुंडूराव म्हणाले, “महात्मा गांधी हे हिंदू संस्कृतीवर विश्वास ठेवणारे होते. ते कट्टर शाकाहारी होते. ते सर्व दृष्टीने लोकशाही नेते होते. मोहम्मद जीन्ना यांच्यापेक्षा सावरकर हे अधिक कट्टरवादी होते.”
🕧 12.42pm | 03-10-2024📍Nagpur.
LIVE | Media interaction#Maharashtra #Nagpur https://t.co/0yLnbaBDlI
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 3, 2024
देवेंद्र फडणवीसांचे गुंडूराव यांना चोख प्रत्युत्तर
कॉँग्रेस नेते दिनेश गुंडूराव यांनी सावरकरांबद्दल वादग्रस्त विधान केले. त्यावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ”या लोकाना सावरकरांबद्दल काहीच माहिती नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी गायीबद्दल आपले विचार योग्य पद्धतीने मांडले आहे. गाय मानवाला जन्मापासून मृत्यूपर्यंत मदत करते. गायीला आम्ही एक देवाचा दर्जा दिला आहे. राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल चुकीची विधाने करणे सुरू केले आहे. त्यांचे हे काम इतर नेते पुढे नेत आहेत.
Released the Kannada version of the book "Gandhi's Assassin: The Making of Nathuram Godse and His Idea of India" by renowned journalist Dhirendra K. Jha at an event organized by Jagrita Karnataka and Aharnishi Prakashana.
I appreciate the efforts of renowned columnist A.… pic.twitter.com/1Bi5lTGRVT
— Dinesh Gundu Rao/ದಿನೇಶ್ ಗುಂಡೂರಾವ್ (@dineshgrao) October 2, 2024
सुशीलकुमार शिंदेंकडून सावरकरांचे कौतुक
कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या आत्मचरित्रात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे कौतुक करण्यात आले आहे. आता या गोष्टीमुळे काँग्रेसची कोंडी होण्याची शक्यता आहे. सुशीलकुमार शिंदे काँग्रेसचे मोठे नेते आहेत. केंद्रीय गृहमंत्री ते राज्याचे मुख्यमंत्री अशी अनेक महत्वाची पदे त्यांनी भूषवली आहेत. दरम्यान त्यांच्या आत्मचरित्रामध्ये स्वातंत्र्यवीरांचे कौतुक करण्यात आले आहे. सावकरकरांनी अस्पृश्यता आणि जातीयवाद संपवण्यासाठी प्रयत्न केले होते. स्वातंत्र्यवीर सावरकर हे विज्ञानवादी होते. कॉँग्रेसला विचारसरणी सुधरण्याची गरज आहे, असे स्पष्ट मत सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या आत्मचारित्रामध्ये मांडले आहे.