फोटो सौजन्य: iStock
आजकाल रेल्वे स्थानकांजवळ अज्ञात मृतदेह आढळण्याच्या घटना वाढत चालल्या आहेत. या घटना केवळ पोलीस यंत्रणेसाठीच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांसाठीही चिंतेचा विषय ठरत आहेत. अचानक मृतदेह आढळल्यावर पोलिसांची धावपळ सुरू होते आणि तपासाची चक्रे वेगाने फिरायला लागतात. त्याचवेळी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते आणि परिसरात गोंधळाची स्थिती उद्भवते. अशीच एक घटना कर्जत परिसरात घडली आहे. केळवली आणि डोलवली रेल्वे स्थानकाच्या दरम्यान एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. मृतदेहाच्या ओळखीबाबत अजून स्पष्टता नाही. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे. या प्रकरणाचा तपास करताना पोलिस स्थानिक नागरिकांशी चौकशी करत आहेत आणि सीसीटीव्ही फुटेजचीही मदत घेतली जात आहे.
Devendra Fadnavis: “त्यांचे खायचे वांदे अन् ते न्युक्लिअर…;” फडणवीसांची पाकिस्तानवर खोचक टीका
कर्जत तालुक्यात गेल्या काही दिवसापासून अनेक दुर्घटना घडल्या असून यामध्ये काही ठिकाणी मृतदेह सापडल्याने खळबळ माजली असता 26 एप्रिल रोजी मध्य रेल्वेच्या केळवली व डोलवली रेल्वे स्थानकाच्या मध्यवर्ती ठिकाणी एक मृतदेह सापडल्याने खालापूर तालुक्यात खळबळ माजली असून याबाबत अनेक तर्कवितर्क वर्तवले जात या घटनेचा पुढील अधिक तपास खालापूर पोलीस ठाणे करीत आहे.
तर या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पवार व पोलीस प्रशासनाने या ठिकाणी धाव घेत सर्व घटनेचा आढावा घेतला आहे.
Pune- Bengaluru Express Way: प्रवाशांसाठी खुशखबर! पुणे – बंगळुरू महामार्ग आता 8 पदरी होणार
खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या मध्य रेल्वेवरील केळवली व डोलवली रेल्वे स्थानकाच्या दरम्यान मध्यवर्ती ठिकाणी 26 एप्रिल दुपार 2 वाजण्याच्या सुमारास एक मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली, प्रथम दर्शनी महिला का पुरुष या बाबत अनेक तर्कवितर्क वर्तवले जात असताना पोलिस प्रशासनाने सर्व घटनेचा आढावा घेतला असता पुरुष असल्याचे निष्पन्न झाले. सदर अपघात हा काही दिवस पूर्वीचा असून बॉडी डी कंपोज झालेली आहे. तर डेड बॉडी दगडी खाली सापडल्याने संशय व्यक्त केला जात आहे