मुंबई : मुंबईतील घाटकोपर भागात सोमवारी जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसाने लोकांची तारांबळ उडाली. लोकं मिळेल त्या ठिकाणी आ़डोसा घेत होते. घाटकोपर परिसरात काल वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे पेट्रोल पंपावरील लोखंडी होर्डिंग (Ghatkopar Hoarding Collapse) खाली पडलं. या दुर्घटनेतील मृतांची संख्या आता 14 वर पोहोचली आहे. तर 43 जणांवर रुग्णालायत उपचार सुरू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जखमींच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली असून जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार उचलणार असल्याचेही सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी साडेतीन चारच्या सुमारास घाटकोपर परिसरातली जिमखान्याजवळ हा अपघात झाला. वादळी वाऱ्यानं घाटकोपरच्या समता कॉलनीतील पेट्रोल पंपावर भलमोठं होर्डिंग कोसळलं. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली. तात्काळ राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल ,अग्निशमन दल आणि पोलिसांची पथके तात्काळ मदत देण्यासाठी घटनास्थळी रवाना झाली. मदत आणि बचाव कार्यादरम्यान क्रेन आणि गॅस कटरचा वापर करण्यात आला. या अपघातात अनेक आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला असून 43 जण जखमी आहेत. दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारीच परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांचीजाहीर केली आहे. जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार उचलणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.
घाटकोपर येथील दुर्घटनेनंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील मुलुंड परिसरात होणारी निवडणूक रॅली रद्द केली आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत सांगतिलं की, या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
Maharashtra | Ghatkopar hoarding collapse incident | Maharashtra Deputy CM Devendra Fadnavis has cancelled his Lok Sabha campaign and public meeting in the Mulund area after the hoarding collapse incident at Ghatkop.
Dy CM will shortly meet the affected people in the incident. https://t.co/XGqDyQjIuS
— ANI (@ANI) May 13, 2024