Hingoli Congressचा बालेकिल्ला ढासळला! अंतर्गत गटबाजी आणि नेत्यांच्या 'एक्झिट'मुळे अस्तित्वासाठी संघर्ष
Hingoli Politics: एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंगोली जिल्ह्यात आज पक्ष अस्तित्व टिकवण्यासाठी झगडताना दिसत आहे. बाहेरील पक्षांपेक्षा अंतर्गत गटबाजी, नेतृत्वाची कमतरता आणि नेत्यांच्या एक्झिटमुळे काँग्रेसची ताकद कमी झाल्याचे चित्र सध्या दिसत आहे. हिंगोली, कळमनुरी आणि वसमत या तीन विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा एकेकाळी दबदबा होता. हिंगोलीत सलग तीन वेळा काँग्रेसचे आमदार निवडून आले होते, तर कळमनुरीतही पक्ष मजबूत होता. दिवंगत नेत्या रजनीताई सातव आणि दिवंगत खासदार राजीव सातव यांनी जिल्ह्यात काँग्रेसला मोठे बळ दिले. २०१४ च्या मोदी लाटेतही राजीव सातव यांनी विजय मिळवत हिंगोलीत काँग्रेसचा प्रभाव कायम असल्याचे दाखवून दिले. युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, पक्षाचे प्रवक्ते आणि गुजरातचे प्रभारी अशी जबाबदारी सांभाळत त्यांनी राष्ट्रीय स्तरावरही ठसा उमटवला.
नांदेड भाजपला आता निष्ठावंतांची गरज नाही? स्वीकृत नगरसेविकांबाबत आश्वासन वेगळे अन् निर्णय वेगळा
कॉंग्रेसचा कोविड काळात राजीव सातव यांच्या निधनानंतर जिल्ह्यातील काँग्रेस नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण झाली. आदिवासी चेहरा मानले जाणारे माजी आमदार संतोष टार्फे यांनी पक्ष सोडला, त्यानंतर जिल्हाध्यक्ष संजय बोढारे आणि दिलीप देसाई यांनीही काँग्रेसला रामराम केला. मागील विधानसभा निवडणुकीत हिंगोलीची जागा मित्रपक्षाला सोडल्याने माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनीही पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. राजीव सातव यांच्या पश्चात डॉ. प्रज्ञा सातव यांच्या रूपाने काँग्रेसला नवे नेतृत्व मिळेल अशी अपेक्षा होती. पक्षाने त्यांना विधान परिषद सदस्यत्व आणि प्रदेश उपाध्यक्षपद दिले होते. मात्र लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला जागा न मिळाल्याने पक्षाची ताकद आणखी कमी झाली. त्यातच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने कॉंग्रेसला आणखी मोठा धक्का बसला.
सध्याच्या परिस्थितीत जिल्ह्यात काँग्रेसची जबाबदारी सुरेश अप्पा सराफ यांच्यावर आहे. प्रदेश चिटणीस जकी कुरेशी आणि वसमतच्या माजी नगराध्यक्षा याच्याकडेही नेतृत्व म्हणून पाहिले जाते. मात्र है नेतृत्व सध्या फारसे सक्रिय दिसत नसल्याची चर्चा आहे. पक्षाचे प्रभारी साहेबराव कांबळे आणि प्रदेश उपाध्यक्ष सचिन नाईक याच्या माध्यमातून संघटन मजबूत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
सक्षम महिला, आधुनिक शेती, शिक्षणाचा ध्यास! नांदेड जिल्हा परिषदेचा २३ कोटी २६ लाखांचा
प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी कळमनुरी ते हिंगोली पदयात्रा काढून पक्षाला सक्रिय करण्याचा प्रयत्न केला. यात सुरेश अय्या सराफ, रमेश शिंदे आणि मिलिंद उबाळे यांच्यासह अनेक कार्यकत्यांनी सहभाग घेतला. मात्र या आआंदोलनातून पक्षाला अपेक्षित राजकीय उभारी मिळाल्याचे चित्र दिसले नाही.






