पावसाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर वातावरणात सतत बदल होत असतात. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणे फार आवश्यक आहे. दमट हवामान संसर्गाच्या वाढीसाठी पोषक ठरते. या दिवसांमध्ये डेंग्यू, मलेरियासोबतच इतर संसर्गजन्य आणि साथीच्या आजारांचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढतो. त्यामुळे आहारात चुकीच्या पदार्थांचे सेवन केल्यास संपूर्ण आरोग्य बिघडून जाते. साथीच्या आजारांची शरीराला लागण झाल्यास रोगप्रतिकारशक्तीवर थेट परिणाम होतो. चला तर जाणून घेऊया पावसाळ्यात कोणत्या पदार्थांचे सेवन करू नये. (फोटो सौजन्य – istock)
पावसाळ्यात 'हे' पदार्थ खाण्याची अजिबात करू नका चूक! पचनाच्या समस्या वाढून होऊ शकते फूड पॉइझनिंग

दुषित मांस व मच्छीचे सेवन

लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं जंक फूड खायला खूप जास्त आवडते. पण रस्त्यावरचे तिखट किंवा तेलकट पदार्थ खाल्ल्यास उलट्या, जुलाब आणि आजाराची लागण होण्याची शक्यता जास्त असते.

मांस आणि माशांचे सेवन करणे शरीरासाठी धोक्याचे ठरते. दुषित मांस व मच्छीचे सेवन केल्यामुळे पोटाचे विकार होऊन आरोग्य बिघडते.

पावसाळ्यात डास, मच्छर, जंतू, विषाणू, किटाणू यांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणावर वाढतो. त्यामुळे रस्त्यावरील पाणीपुरी अजिबात खाऊ नये. यामुळे डायरिया होण्याची शक्यता असते.

कॅल्शियम युक्त गुणधर्मांनी समृद्ध असलेले दूध पावसाळ्यात पिऊ नये, असा सल्ला कायमच दिला जातो. कारण दुधात जंतू किंवा हानिकारक विषाणू मिक्स झाल्यास अपचनाचा त्रास वाढतो.






