महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी भाजप नेते सज्ज झाले आहेत. भाजपच्या सर्वच नेत्यांकडून उमेदवारांचा जोरदार प्रचार केला जात आहे. अशातच भाजपचे उमेदवार राम सातपुते (Ram Satpute) यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) सोलापूरमध्ये येणार आहेत. नरेंद्र मोदी सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि चंद्रशेखर बावनकुळे यांचे सोलापूरमध्ये आगमन झाले आहे. या सभेला येण्यापूर्वीच देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी त्यांच्या भाषणात उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापूरमध्ये आलं पाहिजे, अशी जनतेची इच्छा आहे. तसेच आम्ही नरेंद्र मोदी यांना विनंती केल्यानंतर आज सोलापूरमध्ये सभाचे आयोजन करण्यात आले आहे. नरेंद्र मोदी सोलापूरमध्ये येणार असल्याने सगळीकडे प्रचंड गर्दी होणार आहे. आजची सभा भव्य असणार आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. नरेंद्र मोदी आणि भाजपाला मत देणे म्हणजे विनाशाला आमंत्रण देणे असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले होते. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, उद्धव ठाकरे यांना उत्तर द्याची आम्हाला गरज वाटत नाही. कारण संपूर्ण देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला विकास पाहत आहे. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या एका विकास कामाबद्दल सांगावं. उद्धव ठाकरे अडीच वर्ष मुख्यमंत्री होते. पण त्यांनी कुठलेच विकास काम केले नाही. मुळे उद्धव ठाकरे यांनी मोदींबद्दल बोलणे म्हणजे सूर्याकडे थोबाड करुन थुंकण्याचा प्रकार आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
संजय राऊत ही व्यक्ती आहे तरी कोण? ते मला माहित नाही. पण ठाकरेंनी ते म्हणजे महाराष्ट्र आहेत. या मानसिकतेमधून बाहेर आलं पाहिजे,असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. आम्ही राम राम करतो याचा शिवसेनेला का राग येतो? भारतामध्ये राम राम करायचे नाहीतर पाकिस्तानमध्ये करायचे का? आम्ही राम राम बोलणारच, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. त्यामुळे आता याला उद्धव ठाकरे काय प्रतिउत्तर देणार हे पाहणं महत्वाचे असणार आहे.