देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे (फोटो- instagram)
मुंबई: राज्यात लवकरच विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. २३ तारखेला मतमोजणी होणार आहे. दरम्यान महायुती आणि महाविकास आघाडीने आपपल्या उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या आहेत. दडरम्यान महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात निवडणुकीनंतर कोण मुख्यमंत्री होणार हे अजूनही स्पष्ट नाहीये. महायुती एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवत असल्याचे संगत असली तर निवडणुकीनंतर काय होणार हे स्पष्ट करत नाहीये. त्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठे भाष्य केले आहे. २०२४ च्या निवडणुकीनंतर मुख्यमंत्री हा भाजपचाच होईल असे राज ठाकरे म्हणत आहेत. दरम्यान त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मिडियावर राज ठाकरे यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे.
विधानसभा निवडणूक झाल्यानंतर महायुतीमध्ये मुख्यमंत्री कोण होणार हे अजूनही स्पष्ट नाहीये. दरम्यान एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलटण मुख्यमंत्री हा भाजपचाच होईल असे राज ठाकरे म्हणाले आहेत. तर २०२९ मध्ये मनसेचा मुख्यमंत्री होईल असे राज ठाकरे म्हणाले आहेत. दरम्यान राज ठाकरेंच्या या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे राज ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मिडियावर राज ठाकरे आणि त्यांचा असा एक फोटो शेअर केला आहे. त्यामुळे राज ठाकरे निवडणुकीनंतर भाजपसोबत येणार का अशी चर्चा सुरू झाली आहे.
अमित ठाकरे यांच्याविरुद्ध महायुतीने उमेदवार दिला आहे. महाविकास आघाडीने देखील उमेदवार दिला आहे. अमित विरुद्ध उमेदवार देणे हा प्रत्येकाच्या स्वभावाचा भाग आहे. प्रत्येकजण आपापल्या स्वभावानुसार वागत असतो. मला सत्तेत येण्यासाठी कितीही वेळ लागला तरी चालेल पण फोडाफोडी करून मला सत्ता नको आहे, असे राज ठाकरे म्हणाले आहेत.
फडणवीस यांचे देशमुखांना आव्हान
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना मनसुख हीरेन मृत्यू प्रकरण चांगलेच गाजले होते. तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हा मुद्दा विधानसभेत चांगलाच उचलून धरला होता. त्यानंतर जे काही घडले ते राज्यातील सर्व जनतेला माहिती आहेच. तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर देखील अनेक आरोप करण्यात आले होते. मनसुख हीरेन याची हत्या होणार आहे हे अनिल देशमुख यांना माहिती होते की नाही असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना विचारले आहे. या प्रश्नाचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे असे थेट आव्हानच फडणवीस यांनी देशमुखांना दिले आहे. या प्रश्नाचे उत्तर ते देणार नाहीत हे मला माहिती नाही, मात्र माझी तशी अपेक्षाही नाही असे फडणवीस म्हणाले आहेत. मनसुख हीरेन हत्येच्या प्रकरणामध्ये विधानसभेत मी शंका उपस्थित केली होती. त्यावेळेस मनसुख हीरेन यांना गायब करण्यात आले तसेच त्यांची हत्या होऊ शकते अशी मी भीती सदनामध्ये व्यक्त केली होती. त्यामुळे माझे असे मत आहे की, अनिल देशमुख यांनी यावर उत्तर दिले पाहिजे.