ऊस दराच्या प्रश्नावरून शेतकरी संतप्त; फडणवीसांच्या ताफ्यावर उसाच्या कांड्या फेकण्याचा प्रयत्न
Kolhapur Politics : ऊस दराच्या प्रश्नावरून कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. काल जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत कारखानदारांनी पाठ फिरवल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर ऊस आंदोलन पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. असे असतानाच आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूर दौऱ्यावर आले असता अज्ञात शेतकऱ्यांनी त्यांच्या ताफ्यावर उसाच्या कांड्या फेकण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
Chhatrapati Sambhajinagar: नगरपरिषद निवडणुकीचा ‘धुरळा’; राजकीय ‘जुगाड’ आणि सत्तेच्या
दरम्यान, शेतकरी संघटनांनी ऊस दरवाढीची मागणी तातडीने मान्य न झाल्यास व्यापक आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. ऊस दराच्या प्रश्नावरून कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. काल जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत कारखानदारांनी चर्चेला पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांचा संताप वाढला आहे.
या पार्श्वभूमीवर ऊस आंदोलन पेटण्याची शक्यता निर्माण झाली असतानाच, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूर दौऱ्यावर आले असता अज्ञात शेतकऱ्यांनी त्यांच्या ताफ्यावर उसाच्या कांड्या फेकण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, ऊस दरवाढीचा निर्णय तातडीने न झाल्यास जिल्हाभर तीव्र आंदोलन उभारणार असल्याचा इशारा दिला आहे.
जिल्ह्यातील ऊस दराच्या प्रश्नावरून शेतकऱ्यांचा संताप वाढत असून माजी खासदार राजू शेट्टी यांनी सरकार आणि कारखानदारांना थेट इशारा दिला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील आठ साखर कारखान्यांनी मागील हंगामाची एफआरपी थकवली असून, त्यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही, एफआरपीपेक्षा कमी दर जाहीर करणे हा कायद्याचा भंग आहे. असे करणाऱ्या तीन कारखान्यांना अद्याप नोटीस काढलेली नाही. गेल्या हंगामातील रेव्हिन्यू शेअरिंग फॉर्म्युल्यानुसार (आरएसएफ) २०० रुपयांचा भरणा झालेला नाही. कायदा फक्त शेतकऱ्यांसाठीच आहे का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
राजू शेट्टी म्हणाले, “गेल्या वर्षीच्या रिकव्हरीनुसार ऊसाची एफआरपी ठरते. बाजारातील साखरेचा दर ४२ रुपये असूनही एफआरपी ३१ रुपयांनुसार ठरवली जाते. त्यामुळे जिल्ह्यातील एफआरपी चार हजार रुपयांच्या वर असली पाहिजे. जोपर्यंत थकीत एफआरपी आणि आरएसएफप्रमाणे २०० रुपयांची देयके मिळत नाहीत, तोपर्यंत एकही कारखाना सुरू होऊ देणार नाही.” बुधवारी (ता. ५) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्ह्यात दौऱ्यावर येणार असून, “त्या वेळी आम्ही ऊस दराबाबत थेट जाब विचारणार आहोत,” असा इशाराही शेट्टी यांनी दिला.






