आधार कार्ड सारखा आणखी एक युनिक आयडी येणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय
नागपूर : राज्याची तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून धुरा सांभाळल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी (दि.12) नागपुरात येत आहेत. त्यांचे राज्याचे प्रमुख म्हणून शहरात पहिल्यांदाच आगमन होत असल्याने भाजपने त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे. विमानतळ ते त्यांच्या निवासस्थानापर्यंत स्वागत रॅली काढली जाणार आहे. ठिकठिकाणी पुष्पवृष्टींसह ढोलताशंच्या गजरात त्यांचे स्वागत केले जाणार आहे. शहर भाजपने यासाठी जोरदार नियोजन केले.
हेदेखील वाचा : Kurla best bus service: कुर्ल्यातील बेस्ट बस सेवा आजही बंदच, प्रवाशांची पायपीट; प्रवासासाठी ‘या’ मार्गांचा वापर करा
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या शपथविधीसाठी विदर्भातील हजारो कार्यकर्ते मुंबईला गेले होते. फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांचे प्रथमच नगरात आगमन होत आहे. सोमवारी विधानसभेचे अधिवेशन संपले. यात नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधीही आटोपला. शपथविधीनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता होती. मात्र, अद्यापही तिन्ही पक्षांकडून संभाव्य मंत्र्यांची यादी तयार झालेली नाही. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यात 12 डिसेंबरला फडणवीस शहरात येणार असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे हा विस्तार लांबणार, अशी चर्चा आहे.
त्यातच नागपूरच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी हा विस्तार होणे अपेक्षित असल्याने, मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे त्यानंतर केवळ चारच दिवसांचा कालावधी उरतो, हे विशेष. त्यात आता नागपुरात फडणवीस येत आहेत. भाजपकडून फडणवीसांच्या स्वागतासाठी तयारी करण्यात येत आहे. ‘न भूतो न भविष्यती’ असा हा स्वागत मार्च असणार आहे. आगमनानंतर त्यांचा दिवसभर शहरात मुक्काम राहणार आहे.
विमानतळापासूनचा मार्ग सजणार
मुख्यमंत्री फडणवीस यांचे विमानतळावर आगमन झाल्यानंतर त्यांना मोकळया वाहनाने धरमपेठ निवासस्थानापर्यंत मिरवणूक काढली जाणार आहे. त्यामुळे विमानतळापासूनचा मार्ग दुतर्फा सजविला जाणार आहे. संपूर्ण मार्गात भगव्या पताका लावण्यात येणार आहे. संपूर्ण परिसर भगवामय करण्याचा प्रयत्न आहे. याशिवाय, झेंडे, कटआऊट्स, मार्गावर अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी तसेच क्रेनच्या मदतीनेही पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. जेसीबीच्या सहाय्याने फुलांची उधळण करण्याचाही बेत आहे.
त्यात कार्यकर्ते, समर्थक, सर्वसामान्य लाडक्या बहिणींचाही समावेश मोठ्या प्रमाणात आहे. मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर ते कामात व्यस्त झालेले आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार, दिल्लीत जाऊन नेत्यांची भेट तसेच नागपूर अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्ताराचे त्यांचेच संकेत, यामुळे त्यांच्याकडे फारच कमी वेळ आहे. यातून वेळ काढून ते शहरात येत आहे.
हेदेखील वाचा : Mahavikas Aghadi News: EVM विरोधातील लढाई तीव्र होणार; महाविकास आघाडीचा मोठा निर्णय