नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसमधील (Rashtrawadi Congress) फाटाफुटीनंतर आता दाेन्ही पवार गटांकडील कार्यकर्ते तसेच पदाधिकाऱ्यांकडून स्थानिक मध्यवर्ती कार्यालयांवरही ताबा सांगितला आहे. आज त्याचे पडसाद मुंबई नाका परिसरात असलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यालय परिसरात बघायला मिळाले. अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सकाळपासूनच कार्यालयावर ताबा मिळवत ठिय्या दिला तर शरद पवारांकडील गटानेही कार्यालयाकडे आगेकूच करत आपला दावा सांगितला.
आज दाेन्ही गट आमने सामने आले आणि घाेषणाबाजी सुरू झाली. राष्ट्रवादीचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या समर्थक आमदारांनी महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी झाल्यामुळे शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीतील अंतर्गत वादही समाेर आला. शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादीची देखील अवस्था झाली असून, दाेन गट पडल्यामुळे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये देखील दाेन गट पडले आहेत. अजित पवारांच्या गाेटात सामील झालेले पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या समर्थकांनी आज सकाळपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे गर्दी केली. पक्षाचे नेते दिलीप खैरे, रवींद्र पगारे, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, समता परिषदेचे प्रदेश सरचिटणीस समाधान जेजुरकर, युवक अध्यक्ष अंबादास खैरे, याेगिता आहेर, प्रेरणा बलकवडे, विद्यार्थी अध्यक्ष गाैरव गाेवर्धने यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी कार्यालयातच डेरा बसविला.
शरद पवार यांच्या गटाकडून कार्यालयावर ताबा वा कब्जा हाेण्यापूर्वीच भुजबळ समर्थकांनी तेथे ठिय्या दिल्याने कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने पाेलीस बंदाेबस्तही तैनात करावा लागला. यामुळे कार्यालय परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झालं होतं. त्याचबराेबर पोलिसांनी या भागात बॅरिकेड्स लावून खबरदारी घेतली हाेती.
दाेन जिल्हाध्यक्ष दाेन गट
दरम्यान, पवारांमधील दाेन गटांमुळे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्येदेखील संख्या विखुरली गेली असून, राष्ट्रवादीचे दाेन जिल्हाध्यक्ष आहेत. यापैकी एक जिल्हाध्यक्ष काेंडाजी मामा आव्हाड यांचा शरद पवारांना तर अन्य दुसरे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगारे यांचे अजित पवारांना समर्थन आहे. यामुळे दाेन जिल्हाध्यक्ष दाेन गट असे चित्र निर्माण झाले असून, शहराध्यक्षांसह सरचिटणीस, फ्रंटल अध्यक्षांसह अन्य पदाधिकारी मात्र अजित पवारांच्या गटामध्ये असल्याने त्यांचे पारडे जड झाले आहे.
[blockquote content=”आम्ही सर्व जण अजित पवार यांच्या बराेबर आहाेत. त्यांच्या नेतृत्वाखाली जाे निर्णय घेतला जाईल ताे आम्हाला सर्वांना मान्य असेल. कार्यालयावर आमचा हक्क आहे. यामुळे आम्ही ते ताब्यात घेतले आहे. ” pic=”” name=”- रंजन ठाकरे, शहराध्यक्ष राष्ट्रवादी”]
[blockquote content=”राष्ट्रवादी काँग्रेस भवन हे पक्षाचे कार्यालय आहे. यामुळे या वास्तुवर पक्षाचाच हक्क आहे. विनाकारण कुणी ते ताब्यात घेऊ नये. कायदेशीर मार्ग माेकळे आहेत. आम्ही देखील कार्यालय ताब्यात घेऊन आमची ताकद दाखवून देऊ. ” pic=”” name=”- काेंडाजी आव्हाड, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस”]
[blockquote content=”छगन भुजबळ या नावाने आमचे राजकारण सुरू झाले आहे. त्याच नावाने राजकारण संपेल. त्यामुळे भुजबळ साहेब आमचे सर्वस्व असून, तेच आमचा पक्ष आहे. ते जिथे जातील आम्ही तिथे राहणार. याच उद्देशाने संपूर्ण जिल्ह्यासह शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहाेत. ” pic=”” name=”- अंबादास खैरे, शहराध्यक्ष- राष्ट्रवादी युवक”]