पुणे : आकुर्डी येथील आर्य एंटरप्रायजेसचे सर्वेसर्वा विकास साखरे यांच्या पुढाकारातून संभाजीनगर परिसरातील सुमारे ५० जेष्ठ नागरिकांना मोफत जीवन प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. त्यामुळे जेष्ठांकडून समाधान व्यक्त करण्यात आले. गेल्या तीन वर्षांपासून साखरे जेष्ठांसाठी हा उपक्रम राबवित आहेत.
संभाजीनगर येथील साई सोसायटी येथे साखरे यांच्या निवासस्थानी परिसरातील जेष्ठांसाठी मोफत जीवन प्रमाणपत्र शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जगद्गुरू साई जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सतीश सराटकर, सचिव नितीन पतंगे, सदस्य मन नारायण बाजारे, लक्ष्मण कुलकर्णी, एम. जी. माने, वामन कुलकर्णी, नरेंद्र शेंडे आदी उपस्थित होते. दरम्यान, साखरे यांच्यामुळे जीवन प्रमाणपत्रांसाठी जेष्ठ नागरिकांना करावी लागणारी पायपीट थांबली तसेच वेळ आणि पैशाची बचत झाली. साखरे हे जेष्ठांसाठी कायम मदतीसाठी तत्पर असतात. जेष्ठांचे अनेक प्रश्न, समस्या मार्गी लावण्यासाठी ते निस्वार्थपणे काम करीत असल्याचे जगद्गुरू साई जेष्ठ नागरिक संघाचे सचिव पतंगे यांनी सांगितले.
[blockquote content=”दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात पेन्शनधारक जेष्ठ नागरिकांना जीवन प्रमाणपत्राची गरज असते. ते काढण्यासाठी पोस्ट आणि भविष्य निर्वाह निधी कार्यालय आकुर्डी येथे जावे लागते. तेथे मोठी रांग असते. शिवाय हे प्रमाणपत्र काढताना जेष्ठांना अनेक अडचणी येतात. उतारवयात त्यांना कोणताही त्रास होऊ नये. घरजवळच जीवन प्रमाणपत्र मिळावे, या हेतूने जेष्ठांसाठी मोफत जीवन प्रमाणपत्र शिबिराचे आयोजन केले होते. त्याला जेष्ठांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.” pic=”” name=”-विकास साखरे, सामाजिक कार्यकर्ते.”]