दिवाळीमुळे पुणे मेट्रो काही काळ बंद असणार आहे. (फोटो - सोशल मीडिया)
पुणे : देशभरामध्ये दिवाळीचा मोठा उत्साह दिसून येत आहे. दिवाळीनिमित्त अनेक सोयी सुविधांमध्ये बदल करण्यात आला आहे. पुणे मेट्रो सेवेबाबत देखील बदल करण्यात आला आहे. त्यामुळे मेट्रोने प्रवास करणार असाल तर ही बातमी महत्त्वाची ठरणार आहे. दिवाळीच्या निमित्त पुण्यातील मेट्रो सेवेमध्ये बदल करण्यात आला आहे.
पुणे मेट्रोच्या अधिकाऱ्यांकडून दिवाळीबाबत मेट्रो सेवा बंद असल्याची घोषणा करण्यात आली आहे. पुणे मेट्रोने बुधवारी आपल्या प्रवाशांसाठी सोशल मीडियावर एक महत्त्वाचे अपडेट शेअर केले. शुक्रवारी (1 नोव्हेंबर) लक्ष्मीपूजनामुळे सांयकाळच्या वेळेमध्ये मेट्रो बंद राहणार आहे. पुणे मेट्रोच्या दोन्ही मार्गावरील (पीसीएमसी ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी) मेट्रो सेवा संध्याकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. सकाळी 6 ते संध्याकाळी 6 पर्यंत ही सेवा सुरू राहणार आहे.
लक्ष्मीपूजनामुळे मेट्रो सेवा संध्याकाळपासून बंद राहणार आहे. शनिवारपासून, मेट्रो सेवा सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत पुन्हा सुरू होईल. यापूर्वी पुणे मेट्रोने दिवाळीमुळे मोठी गर्दी झाली होती. शहरातील मध्यवर्ती भागामध्ये खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांनी मेट्रो सेवेचा मोठा वापर केला. त्यामुळे मेट्रोचे उत्पन्न देखील चांगले वाढले.
#AttentionPlease
कृपया लक्ष द्या !! पुणे मेट्रोच्या प्रवाशांसाठी महत्वाची सूचना शुक्रवार, दिनांक १ नोव्हेंबर २०२४ रोजी लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने पुणे मेट्रोची सेवा सकाळी ६ वाजेपासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत उपलब्ध असेल. सायंकाळी ६:०० ते रात्री १०:०० दरम्यान मेट्रोची सेवा बंद… pic.twitter.com/vHHQVWzQbV — Pune Metro Rail (@metrorailpune) October 30, 2024
भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते आणि भारतीय जनता युवा मोर्चा (बीजेवायएम) महाराष्ट्राचे उपाध्यक्ष कुणाल टिळक यांनी दिवाळीनिमित्त पुणे मेट्रोला रात्री 11 वाजेपर्यंत वेळ वाढवण्याची विनंती केली होती. मात्र पुणे मेट्रोचे कार्यकारी संचालक (प्रशासन आणि जनसंपर्क) हेमंत सोनवणे यांनी सांगितले की, मेट्रो सेवेच्या वेळेत लवकरच वाढ होण्याची शक्यता नाही. या क्षणी वेळ वाढवणे कठीण आहे. आम्हाला रात्री गाड्या आणि इतर पायाभूत सुविधांची प्रतिबंधात्मक देखभाल करावी लागते, असे मत मांडले होते. त्यानंतर आता दिवाळीमुळे पुणे मेट्रो सायंकाळी बंद राहणार आहे.