File Photo : Eknath Shinde
विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठं बहुमत मिळालं असून मुख्यमंत्री भाजपचाच होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे नाराज असवल्याची सूत्राची माहिती आहे. त्यांनी सर्व गाठीभेटी रद्द केल्या असून मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उद्या राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन (C. P. Radhakrishnan) यांची भेट घेणार आहेत. उद्या सकाळी ११ वाजता होणाऱ्या राज्यपालांच्या भेटीत एकनाथ शिंदे त्यांच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. तर मुख्यमंत्र्यांबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री देखील राजीनामा देण्याची शक्यता आहे. उद्या विधानसभेची मुदत संपत आहे. त्यामुळे तिन्ही मंत्री उद्या राजीनामा देणार आहेत.
मुख्यमंत्रिपदाबाबत बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
आज दिल्ली भाजपची बैठक पार पडली. अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील अशी चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. दरम्यान अमित शहा आजच मुंबईत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग आला आहे. महायुतीची सत्ता आल्यानंतर शिंदे गट आणि भाजपमध्ये मुख्यमंत्रिपदावरून जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी शिंदे गटाने ठाण्यातील कोपरी येथील मंदिरात आरती सुद्धा आयोजित केली होती. या आरती दरम्यान महिलांनी एकनाथ शिंदे यांचे छायाचित्र असलेले फलक हाती घेत. मुख्यमंत्री म्हणून शिंदेच हवे असल्याचं सांगितलं.
विधानसभा निवडणूकीत महायुतीला सत्ता मिळाली आहे. भाजपचे सर्वाधिक आमदार निवडून आल्याने आता देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये मुख्यमंत्री पदासाठी चढाओढ पहायला मिळत आहे. दोन्ही पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मुख्यमंत्री त्यांच्याच पक्षाचा व्हावा अशी मागणी करत आहेत. दरम्यान कोपरी येथील दौलतनगर परिसरातील एका मंदिरात शिवसेना शिंदे गटाने आरती आयोजित केली होती. या आरतीला महिला पदाधिकारी मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या.
राजकारणासंदर्भात बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
महाराष्ट्रात महायुतीला २३९ जागांचं रेकॉर्डब्रेक बहुमत मिळालं आहे. मात्र महायुतीचा मुख्यमंत्री कोण? हे निश्चित व्हायचं आहे. अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला सहमती दर्शवली आहे. मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून अद्याप अशी कोणतीही भूमिका समोर आलेली नाही. मुख्यमंत्रिपदाबाबत दोन दिवसांत निर्णय होईल आणि मुख्यमंत्री शिंदे होतील. मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी मिळेल, जे वादग्रस्त ठरले आहेत. त्याचाबाबत निर्णय घेतला जाईल, असं आमदार संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.