उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंनी सेनेच्या आमदारांना दिल्या महत्त्वपूर्ण सूचना
राज्यात सध्या मराठीचा मुद्दा तापला असताना पुण्यातील एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकना शिंदे यांनी जय गुजरातची घोषणा दिली. त्यामुळे ठाकरे गटाकडून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. त्यानंतर पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांनी भूमिका मांडली. गुजरात पाकिस्तानमध्ये आहे का? भारतातच आहे. मी आधी जय महाराष्ट्र म्हणालो, नंतर जय गुजरात म्हणालो. मी नेहमी जय हिंदीही बोलतो, त्यात गैर काय आहे, असं म्हणत त्यांनी याआधी ठाकरे गटाने कधी जय गुजरातची घोषणा दिली होती, याचीही पोलखोल केली. शिंदेंनी पत्रकार परिषदेत त्यांनी ठाकरे गटाचे व्हिडिओही लावत प्रत्युत्तर दिलं आहे.
पुण्यात गुजराती बंधू समाजाच्या वतीने उभारण्यात आलेल्या जयराज स्पोर्ट्स आणि कन्व्हेन्शन सेंटरचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता. केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न झाला. या सोहळ्या एकनाथ शिंदेंनी आपले मनोगत मांडले. भाषणाच्या शेवटी त्यांनी जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात अशी घोषणा दिली.
मराठी हा आमचा श्वास आहे, तर हिंदुत्व आमचा आत्मा आहे. मराठीवरून आमच्यावर जे आता टीका करत आहेत, त्यांच्यावर भाष्य करणार नसल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले. जिनके घर शीशे के होते हैं, वे दूसरों पर पत्थर नहीं फेका करते’, असे म्हणत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचा व्हिडीओ दाखवला. या व्हिडिओत उद्धव ठाकरे जय गुजरात म्हणत असल्याचं दिसत आहे. तसंच आदित्य ठाकरेंचे बॅनर देखील त्यांनी दाखवले, ज्यावर केम छो असा लिहिण्यात आलं होतं. निवडणुकीमध्ये पाकिस्तानी झेंडे नाचवले त्यावेळी तुमचं मराठी प्रेम कुठं गेलं होतं? असा सवालही एकनाथ शिंदेंनी केला. मुंबईमध्ये जिलेबी आणि फाफडा, उद्धव ठाकरे आपणा, असं लिहलेलं पोस्टर दाखवत शिंदेंनी टीका केली.
शिवसेना (युबीटी) नेत्या किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, आज एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्यासमोर ‘जय गुजरात’ म्हणाले. त्यामुळे आता आपल्याला हिंदीसोबत गुजरातीही शिकावी लागेल. बाळासाहेब ठाकरेंच्या आदर्शांचे पालन करण्याबद्दल तुम्ही खूप बोलता, पण बाळासाहेबांनी कधी ‘जय गुजरात’ म्हटलं का? राज्याचे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी कधी ते म्हटले का? त्यांनाही हे आवडलेलं नसणार.