Photo Credit- Social Media जनतेच्या मनातील सरकार स्थापन करणार
Eknath Shinde News: मुंबईत सोमवारी महायुतीची बैठक होणार आहे. मी भाजपला पूर्ण पाठिंबा दिला असून मुख्यमंत्रीपदावर पंतप्रधान नरेंद्र मोदी जे बोलतील तेच अंतिम मानले जाईल, उद्याच्या बैठकीत सर्व काही ठरवले जाईल, अशा शब्दांत महाराष्ट्राचे हंगामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. एकनाथ शिंदे यांच्यासह देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी तीन दिवसांपूर्वी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतली होती.
यावेळी महाराष्ट्राच्या सत्तास्थापनेवरही मोठी चर्चाही झाली होती. त्यानंतर भाजपचा मुख्यमंत्री होणार हेही जवळपास निश्चित झाले. पण त्यानंतर एकनाथ शिंदे कोणालाही न सांगता अचानक त्यांच्या साताऱ्यातील मूळ गावी दरे याठिकाणी निघून गेले. त्यामुळे सत्तास्थापनेतील पेचही वाढला. अखेर तीन दिवसांनी एकनाथ शिंदे मुंबईत दाखल झाले आणि त्यांनी पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा आपण भाजपसोबत असल्याचे जाहीर केले. इतकेच नव्हे तर, आमचे कार्य सुवर्णाक्षरात लिहिले जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्रात नवे सरकार स्थापनेवर एकनाथ शिंदे म्हणाले की, माझी भूमिका पूर्णपणे स्पष्ट असून आमचे काम सुवर्णाक्षरात लिहिले जाईल. आमच्या तिन्ही पक्षांमध्ये समन्वय असून उद्याच्या बैठकीत सर्वकाही निश्चित होईल. मुख्यमंत्रीपदाचा निर्णय अमित शाह आणि पंतप्रधान मोदी घेतील. पंतप्रधान मोदी आणि अमित शाह जो काही निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल,.
शनिवारी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री भाजपचे तर दोन उपमुख्यमंत्री शिवसेना आणि राष्ट्रवादीचे असतील, असे सांगितले होते. पण शिंदे यांना मुख्यमंत्रीपद न दिल्याने नाराजी आहे. मात्र, मुख्यमंत्रीपदाचा निर्णय पंतप्रधान मोदी आणि अमित शहा घेतील, असे ते उघडपणे सांगताना दिसत आहेत.
ऑटोमॅटिक कारपेक्षा मॅन्युअल कार चालवल्याने खरंच फायदा होतो का? जाणून घ्या
एकनाथ शिंदे हे त्यांच्या मूळ गावी सातारा येथून आज मुंबईत दाखल झाले. शनिवारीही शिंदे यांची प्रकृती खालावली होती. त्यांना खूप ताप आणि घशाचा संसर्ग झाला होता. शिंदे यांच्या डॉक्टरांनी त्यांना औषधे देण्यात आली असून त्यांना बरे वाटत असल्याचे निवेदन जारी केले होते. दुसरीकडे, महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील शपथविधी सोहळा ५ डिसेंबरला संध्याकाळी मुंबईतील आझाद मैदानावर होणार आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांबाबत अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदीही सहभागी होणार आहेत. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत भाजपचे देवेंद्र फडणवीस यांचे नाव आघाडीवर आहे.
महायुतीमध्ये खातेवाटपावरुन जोरदार राजकारण रंगले आहे. मात्र ऐनवेळी बैठकी रद्द करुन एकनाथ शिंदे हे त्यांच्या मूळ गावी गेले आहेत. यामुळे ते नाराज असल्याची देखील चर्चा आहे. याबाबत संजय शिरसाट यांनी माध्यमांशी संवाद साधत, शिरसाट म्हणाले की, “एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीची आम्हाला काळजी वाटते. काल त्यांचा ताप 105 वर होता. सत्तेचे समीकरण आता निश्चित झाले आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईत येऊन आराम करतील. त्यानंतर उद्या शिवसेनेच्या (शिंदे) आमदारांची बैठक बोलावली जाईल. त्यानंतर शिवसेनेचा कृती आराखडा ते सांगतील.”
Netflix यूजर्ससाठी मोठा धोका! हॅकर्स ‘अशा’ प्रकारे मिळवत आहेत वैयक्तिक डेटा, बँक खाती