निवडणूक अधिकाऱ्यांना मतदानासंदर्भात नांदेडमध्ये दुसरे प्रशिक्षण देण्यात आले (फोटो - सोशल मीडिया)
Maharashtra Local Body Election : मानवत : नगर परिषद मानवत सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर नगर परिषदेच्या जिजाऊ सामाजिक सभागृह आठवडी बाजार मानवत येथे मतदानासाठी नियुक्त केलेल्या कर्मचारी अधिकारी, कर्मचारी यांची दुसरे प्रशिक्षण निवडणूक निर्णय अधिकारी पांडुरंग माचेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले.
कर्मचाऱ्यांना मतदानासंदर्भात दिली माहिती
मानवत नगर परिषदेसाठी २ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानासाठी मतदान केंद्राध्यक्ष मतदान सहाय्यक मतदान अधिकारी व इतर मतदान अधिकारी असे एकूण २०० अधिकारी, कर्मचारी यांचे दुसरे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. त्यापैकी १८८ इतके कर्मचारी हजर असून १२ प्रशिक्षणार्थी गैरहजर होते. त्यांना निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून तात्काळ गैरहजर बाबतचा खुलासा मागविण्यात आला. प्रशिक्षणाच्या सुरुवातीला निवडणूक निर्णय अधिकारी पांडुरंग माचेवाड यांनी मतदान केंद्राध्यक्ष व इतर मतदान अधिकारी यांना ईव्हीएम मशीन हाताळने, ईव्हीएम मशीन सह इतर साहित्य अगोदरच्या दिवशी साहित्य घेण्यापासून ते मतदान केंद्र उभारणी करणे, दुसऱ्या दिवशी मॉक पोल घेणे, मतदान सुरू करणे वेळोवेळी मतदानाची आकडेवारी क्षत्रिय अधिकारी याच्यामार्फत निवडणूक निर्णय अधिकारी यांना कळविणे मतदान केंद्रावर मतदान सुरळीत पार पडण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाबी समजावून सांगितल्या मतदान संपल्या नंतर मतदान साहित्य जमा करणे बाबतची सर्व इंथमभूत माहिती उपस्थित प्रशिक्षणार्थी यांना प्रशिक्षण मध्ये देण्यात आली.
बंद दाराआड सापडल्या पैशांनी खचाखच भरलेल्या बॅगा; निलेश राणेंनी भाजप नेत्याच्या घरी टाकली धाड
अनेकांची उपस्थिती
यावेळी मास्टर ट्रेनर विलास मिटकरी जिल्हा परिषद शिक्षक उक्कलगाव व त्यांची सहकारी मास्टर ट्रेनर टीमने ई.व्ही.एम, बाबत ई.व्ही.एम. यंत्र कसे हाताळले पाहिजे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संजय खिल्लारे, नायब तहसीलदार स्वप्ना अंबुरे, संगणक ऑपरेटर राहुल खाडे व मानवत नगर परिषद मधील अधिकारी कर्मचारी या प्रशिक्षणास उपस्थित होते.
नवनीत राणा पुन्हा कडाडल्या! धर्म अन् अयोध्येवर टीका करणाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
अनुपस्थित कर्मचाऱ्याविरुद्ध कारवाई
दुसऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमास अनुपस्थित असलेल्या सात कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी देगलूर अनुप पाटील यांनी दिले आहेत. देगलूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ संदर्भात मतदान प्रक्रियेचे दुसरे प्रशिक्षण २५ नोव्हेंबर रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित करण्यात आले. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्राध्यक्ष तसेच मतदान अधिकारी क्रमांक १, २ व ३ अशा एकूण ३०४ कर्मचारी प्रशिक्षणासाठी बोलावण्यात आले होते. यापैकी २९७ कर्मचारी प्रशिक्षणास उपस्थित राहिले, तर ७ कर्मचारी अनुपस्थित होते. अनुपस्थित कर्मचारी यांच्याविरुद्ध करण्याचे आदेश निवडणूक निर्णय अधिकारी अनुप पाटील यांनी दिले.






