पुन्हा एकदा मलायकाचे नाव चर्चेत (फोटो सौजन्य - Instagram)
चाहत्यांना जाणून घ्यायचे आहे की ही अभिनेत्री कोणाला डेट करत आहे आणि ती कोणासोबत फिरत आहे. गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा मलायका प्रेमात असल्याच्या चर्चांना सुरूवात झाली आहे आणि यावेळी तिचा बॉयफ्रेंड तिच्यापेक्षा १७ वर्षांनी लहान असल्याच्याही चर्चा रंगल्या आहेत. पहिल्यांदा कॉन्सर्टमध्ये दोघांना पाहण्यात आले आणि आता एअरपोर्टवर मलायकाच्या मागून काही अंतरावर तिचा बॉयफ्रेंड येताना दिसला, त्यामुळे या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी चालू असल्याच्या चर्चांना वाव मिळाला आहे.
या अफवा कधीपासून पसरत आहेत?
मलायकाचं आयुष्य नेहमीच चर्चेत राहिलं आहे, मात्र तिने त्याकडे कधीही लक्ष दिलं नाही आणि जे आपल्या मनाला वाटेल तेच ती करत आली आहे. २९ ऑक्टोबर रोजी मुंबईत एनरिक इग्लेसियासच्या संगीत कार्यक्रमात मलायका उपस्थित राहिली तेव्हा ती नात्यात असल्याची ही चर्चा सुरू झाली. तिच्यासोबत एक ‘मिस्ट्री मॅन’ दिसला होता आणि सर्वांनाच मल्ला कोणाला डेट करत आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता होती. शो दरम्यान दोघे गप्पा मारताना आणि एकत्र येताना वा जाताना दिसले आणि व्हिडिओदेखील व्हायरल झाले. मात्र आता दुसऱ्यांना पुन्हा एकदा एअरपोर्टवर असेच दृष्यं दिसले आहे.
India’s Got Talent: डोक्यावर ठेवलेल्या चुलीवर चहा! मलायका अरोराचा अनोखा स्टंट, चाहते थक्क
मास्क घालून लपवला चेहरा
दुसऱ्या घटनेनंतर या प्रकरणाला अधिकच महत्त्व प्राप्त झाले आहे. २६ नोव्हेंबर रोजी दुपारी, मलायका अरोरा पुन्हा त्याच पुरुषासोबत मुंबई विमानतळावर दिसली. त्यांनी एकत्र फिरणे टाळले, पण तरीही व्हिडिओग्राफरच्या कॅमेऱ्यात मात्र दोघेही कैद झाले आहेत. मलायका आधी बाहेर पडली आणि त्यानंतर तिचा रूमर्ड बॉयफ्रेंड असणारा व्यक्ती एअरपोर्टवरून बाहेर आला. त्याने मास्कने चेहरा अर्धवट लपवला, त्यामुळे लोकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली. त्यानंतर दोघेही एकाच कारमधून निघून गेले असल्याचंही सांगण्यात येत आहे.
हर्ष मेहता कोण आहे?
या गूढ माणसाबद्दल कोणतीही ठोस माहिती नसली तरी, मीडिया पोर्टल्स वेगवेगळी विधाने करत आहेत. डीएनए इंडियाच्या वृत्तानुसार, हा माणूस ३३ वर्षीय हिरे व्यापारी हर्ष मेहता आहे. दरम्यान, टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, ऑनलाइन चाहते तो व्यापारी नसून मलायकाचा व्यवस्थापक आहे असे मानतात. कोणतेही अधिकृत विधान न करता, चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण होत आहे. सध्या, मलायका अरोरा किंवा हर्ष मेहता (अजूनही नाव जाहीर करण्यात आलेले नाही) या दोघांनीही डेटिंगच्या अफवांवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.






