पुणे विमानतळावर सुरक्षा वाढवली (फोटो- सोशल मीडिया)
पुणे: लोहगाव विमानतळाच्या धावपट्टीजवळ बिबट्या दिसल्याची घटना समोर आल्यानंतर विमानतळ प्रशासनाची मोठी धांदल उडाली आहे. या अनपेक्षित घटनेनंतर सुरक्षा प्रोटोकॉलमध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आले असून, विमानांच्या तपासणीसाठी वापरल्या जाणाऱ्या शिडीचा वापर तातडीने बंद करण्यात आला आहे. विमानतळ परिसरात अतिरिक्त सुरक्षा घेराबंदी करण्यात आली असून, एटीसीपासून ग्राउंड स्टाफपर्यंत सर्व यंत्रणा सतर्क मोडवर ठेवण्यात आल्या आहेत.
घटनेनुसार, विमानतळाच्या धावपट्टीच्या दुसऱ्या टोकाला सोमवारी व मंगळवारी पहाटे बिबट्या दिसल्याची माहिती मिळताच विमानतळ सुरक्षादलाने कारवाई केली. धावपट्टीवर गस्त वाढविण्यात आली आणि सर्व विमानांच्या हालचाली काही काळासाठी नियंत्रित करण्यात आल्या. नुकत्याच वाढलेल्या विमानवाहतुकीमुळे आणि धावपट्टीवरील नियमित हालचालींमुळे अशी घटना अत्यंत गंभीर मानली जात आहे.
बारामती तालुक्यात बिबट्याचा वावर, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण; पिंजरा लावण्याची केली मागणी
वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी विमानतळ परिसराची पाहणी केली असून, बिबट्या शिरकाव कुठून झाला याचा शोध घेण्यासाठी पथक नेमण्यात आले आहे. परिसराभोवतीच्या कुंपणांची तपासणी, सापळे लावणे तसेच रात्रीच्या वेळी कॅमेऱ्याद्वारे गस्त वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
वनविभागाचे अधिकारी म्हणाले की, विमानतळ परिसरात वन्यप्राणी आढळणे अत्यंत अपवादात्मक आहे मात्र आसपास असलेल्या मोकळ्या जागेमुळे आणि डोंगराळ पट्ट्यामुळे कधीकधी या प्राण्यांचा वावर होऊ शकतो. सुरक्षा दृष्टीने विमानतळ प्रशासनाने अधिक दक्षता घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
एअरपोर्ट रन-वे जवळ बिबट्याचे दर्शन






