File Photo : Solapur ZP
सोलापूर : शालेय पोषण आहार योजनेसाठी जिल्हा परिषद, सोलापर अंतर्गत डाटा एन्ट्री ऑपरेटर या पदाची कंत्राटी पद्धतीने भरती करण्यासाठी २५ ऑगस्ट २०१९ रोजीच्या परीक्षेस पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांची परीक्षा २९ व ३० सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ९.०० ते संध्याकाळी ६.०० या वेळेत डायनामिक कॉप्युटर्स, बँक ऑफ इंडिया, सात रस्ता, सोलापूर या ठिकाणी घेण्यात येणार आहे.
यापूर्वी रविवार दिनांक २५ ऑगस्ट २०१९ रोजी परिक्षा निश्चित करण्यात आली होती. परंतु तांत्रिक/ प्रशासकीय कारणास्तव ही परीक्षा रद्द करण्यात आली होती. संबंधीत उमेदवारांनी परीक्षेस प्रवेश पत्रावर नमूद केलेल्या वेळेपूर्वी अर्धा तास अगोदर उपस्थित राहावे. या परीक्षेचे प्रवेश पत्र आपणांस अर्जावर नमुद केलेल्या मोबाईल क्रमांकावर व्हाट्सअपद्वारा प्राप्त होईल. ज्यांना प्रवेश पत्र प्राप्त होणार नाही, अशा उमेदवारांनी ९८९०२९२९६१ या मोबाईल क्रमांकावर व या कार्यालयाशी संपर्क साधून प्राप्त करुन घ्यावे.
[read_also content=”कपाशीवर औषध फवारल्यानंतर दोन शेतमजुरांचा मृत्यू; घातपात झाल्याचा नातेवाईकांचा संशय https://www.navarashtra.com/maharashtra/two-farm-laborers-die-after-spraying-cotton-relatives-suspect-an-accident-nrdm-329191.html”]
परीक्षेस येताना आधार कार्ड /वाहन परवाना/मतदान ओळखपत्र यापैकी एकाची मूळ व छायांकित प्रत त्यावर आधार नंबर नमुद करुन घेवून यावा, असे सचिव, निवड समिती तथा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद, सोलापूर यांनी एका पत्रकान्वये कळविले आहे.