Photo Credit : Team Navrashtra
जालना: “मी आताच सांगतो मी जाणार नसतो, कोर्टाने पण नियमाने वागावं फडणवीसांचे ऐकून वागू नये. मी मराठा समजाला आज एकच सांगतो. मी कुठे सापडत नाही म्हणून प्रवीण दरेकरांसह अजून दहा-पंधरा जणांना माझ्याविरोधात ट्रॅप रचण्याचे काम दिले आहे. माझी काही चूक नसताना मला अडकवण्याचे काम सुरू आहे. तुम्ही तो एफआयआर वाचा, मी कोणचीही फसवणूक केली नाही. तरी मला तुरुंगात टाकण्याचे अभियान फडणवीसांनी सुरू केले आहे आणि हे पाच सहाजण ते राबवत आहेत. तुरुंगात गेल्यावरही तिथेही त्यांचेच लोक असणार तिथे ते मला गोळ्या घालून मारणार आणि मी मरायला तयार आहे.” असा गंभीर आरोप मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे यांनी केला आहे.
मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. पुण्यातील एका नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्या प्रकरणी जरांगे- पाटील, अर्जुन प्रसाद जाधव आणि दत्ता बहीर (सर्व रा. अंबड, जालना) यांच्याविरोधात फसवणूक व अपहार केल्याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी न्यायालयातील सुनावणीला वारंवार बोलावूनही गैरहजर राहिल्याने जरांगेंविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. या अटक वॉरंटवरून जरांगे पाटलांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत.
“मला अटक करून तुरूंगात टाकण्याच अट्टहास का, राज्यातले सर्व कोर्ट फडणवीसांच्या हातात आहेत. तो सांगेल त्यांच्या मागे एसआटी, ईडी,सीबीआय लावली जाते. त्यांच्या सांगण्याने कितीतरी जणांचे वॉरंट रद्द झाले, लोक त्यांना देव म्हणतात पण हा कसा देव आहे. हे सरळ सरळ खुन्नस काढतात. आता मी कुठेच सापडत नाही म्हणून माझ्या विरोधात वॉरंट काढायला सुरूवात केली आहे. पण मी जाणार नाही. देवेंद्र फडणवीसांचे ऐकून पोलीस आणि कोर्ट काम करणार असतील तर मी जात नसतो.
छत्रपतीचे नाटकाचे कारण काढून मला तुरुंगात टाकण्याचा आणि तिथे मारण्याचा डाव असेल तर मी हसत मरायला तयार आहे. फडणवीसांच्या हातून मीही मरण पत्करायला तयार आहे. माझ्या शंभूराजांनी हसत मरण पत्करले आहे. पण धर्मबदलला नाही, आम्हीही त्यांचेच मावळे आहोत. छत्रपतीनीं दाखवून दिले तुकडे झाले तरी चालेल पण झुकणार नाही. आता मरण आले तरी चालेल तुमच्या हाताने आले तरी चालेल, हसत मरण पत्करायला तयार आहे. पण तुमच्या पाया पडतो ती केस मागे घ्या, असे या जन्मात म्हणणार नाही. मी तुरुंगात जायला तयारी आहे. तसा मीही जायला तयार आहे. पण आता तर मी जाणारही नाही. काय करायचयं ते करा. माझ्याकडे द्याला घंटा पैसेही नाही.