सोलापूर : २०२३ मधील खरीप व रब्बीचा उर्वरित पीकविमा, दुष्काळ निधी, अनुदान, येलो मोझॅकची भरपाई व उर्वरित शेतकऱ्यांचे कांदा अनुदान देण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी शुक्रवारी चिखर्डे (ता. बार्शी) येथे आंदोलन करीत बार्शी-धाराशिव रस्ता रोखला. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शुक्रवारी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड व तालुकाध्यक्ष शरद भालेकर यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. पांगरी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
दुर्लक्ष केल्यास विधानसभेलाही दाणादाण
जर शेतकऱ्यांकडे सरकारने दुर्लक्ष केले तर लोकसभेप्रमाणेच विधानसभेलाही शेतकरी सरकारची दाणादाण उडवतील, असा खणखणीत इशाराही शंकर गायकवाड यांनी आंदोलनाप्रसंगी दिला. शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन बार्शीच्या अप्पर तहसीलदार वृषाली केसकर व नारीच्या मंडळाधिकारी, मेघना राजपूत यांनी स्वीकारल