वासिंद: शिंदे-फडणवीस सरकारला मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. कारण शेतकऱ्यांचा किसान लाँग (Farmers Long March) मार्च अखेर स्थगित करण्यात आला आहे. शेतकरी नेते जे. पी. गावित (J. P. Gavit) यांनी याबाबत माहिती दिली आहे. सरकारनं शिष्टमंडळ घेऊन बोलावलं आणि आमच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली. महाराष्ट्र सरकारकडून आमच्या 70 टक्के मागण्या मान्य झाल्या आहेत. बाकीच्या मागण्यांवर विचार सुरु आहे. लोकांना विश्वासात घेऊन आंदोलन (Famrmers Protest Update) मागे घेण्याबाबत बोलणी झाली. बैठकीत जे निर्णय झाले, त्याची प्रत ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आमच्याकडे सुपूर्द केलेली आहे. मागण्या मान्य झाल्याने मोर्चेकरी समाधानी आहेत. उरलेल्या मागण्याही काही दिवसांमध्ये पूर्ण होतील, असा विश्वासही शेतकरी नेते जे. पी. गावित यांनी ठाण्यातील वासिंद (Wasind) येथे व्यक्त केला आहे.
[read_also content=”https://www.navarashtra.com/maharashtra/sanjay-raut-reaction-on-shinde-group-position-nrsr-376925.html https://www.navarashtra.com/maharashtra/sanjay-raut-reaction-on-shinde-group-position-nrsr-376925.html”]
नाशिकहून निघालेला लाँग मार्च ठाण्यात येताच शिंदे सरकारने तातडीने हालचाली केल्या. विशेष म्हणजे विधानभवनात गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शेतकरी संघटनांमध्ये बैठकही पार पडली होती. या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक असल्याची माहिती देण्यात आली.
शेतकऱ्यांचा मोर्चा नाशिकहून ठाणे जिल्ह्यातील वासिंद येथे पोहोचल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी वेगानं सूत्र हलवण्यास सुरुवात केली. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचंही आश्वासन दिलं.
शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या
शेतकऱ्यांनी उत्पादन केलेल्या मालाला चांगला भाव मिळाला पाहिजे
सात बारा उतारा कोरा केला गेला पाहिजे
नुकसानीनंतर शेतकऱ्यांना तातडीने पीकविमा मिळाला पाहिजे
अवकाळी पावसाने होणाऱ्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून त्याची भरपाई मिळाली पाहिजे
वर उल्लेख केलेल्या मागण्यांसह अन्य अनेक मागण्यांसाठी शेतकऱ्यांचा विराट मोर्चा नाशिकहून ठाण्यात आला होता. मात्र आता तो मोर्चा स्थगित करण्यात आला आहे.