File A Case Against The Authorities Regarding Constructions Of Mahabaleshwar A Statement From The Republican Party To State Officials Nrab
महाबळेश्वरच्या बांधकामांबाबत अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा ; रिपब्लिकन पक्षाचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन
महाबळेश्वर तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध बांधकाम व शासन नियमांकडे महसूल व नगरपालिका अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. अशा अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत, अशा आशयाचे निवेदन रिपब्लिकन पक्षाच्यावतीने (आठवले) प्रांताधिकारी राजेंद्र जाधव यांना देण्यात आले.
वाई : महाबळेश्वर तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध बांधकाम व शासन नियमांकडे महसूल व नगरपालिका अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. अशा अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत, अशा आशयाचे निवेदन रिपब्लिकन पक्षाच्यावतीने (आठवले) प्रांताधिकारी राजेंद्र जाधव यांना देण्यात आले.
निवेदनात म्हंटले आहे की, महाबळेश्वर तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध व शासन नियमांना केराची टोपली दाखवत महसूल
व नगरपालिका अधिकाऱ्यांच्या सहकार्याने ही सर्व अवैध बांधकामे राजरोसपण सुरु आहेत. यलो झोन, ग्रीन झोन यासाठी केलेली
नियमावली निव्वळ कागदावरच राहिली आहे. महसूल व नगरपालिका अधिकारी यांच्या कृपेने पाचगणी ते महाबळेश्वर या ठिकाणावर कुठेही बांधकाम करा, त्यासाठी झाडी तोडायची असेल तरी तोडण्यास याच अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळते. डोंगराच्या उतारावर बांधकाम करायचे असेल तरी सर्व गोष्टी कागदोपत्री करेक्ट या विभागांमध्ये उपलब्ध आहेत. आणि त्याचेच फलित हे आता होत असणारे भूस्खलन आहे.
छोटासा पाऊस झाला तरी लगेच होणारे भूस्खलन ही या भागात होत असणाऱ्या अवैध बांधकामांमुळे हाणारा परिणाम आहे. त्यामुळे या भागामध्ये झालेल्या बांधकामांमुळे भविष्यात कोणतीही जीवितहानी झाल्यास हे सर्व अधिकारी जबाबदार असतील या सर्व अधिकाऱ्यांच्या बदली होऊन जरी गेला असेल तरी कामांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी आमची प्रमुख मागणी आहे. या प्रकारे कार्यवाही न झाल्यास संबंधितावर कार्यवाही न करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध न्यायालयात जाण्याचा निर्णय घ्यावा लागेल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. यावेळी अशोक गायकवाड, स्वप्निल गायकवाड, श्रीकांत निकाळजे, जॉन जोसेफ, अतिश भोसले, सागर शिंदे, गणेश सावंत तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.
Web Title: File a case against the authorities regarding constructions of mahabaleshwar a statement from the republican party to state officials nrab