बारामती / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : मानव मिसिंग प्रकरणात तक्रारदाराचे दोन मोबाईल परत करण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक बाळासाहेब पंढरीनाथ पानसरे यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार ३२ व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. एका व्यक्तीची मीसिंग दाखल केल्यानंतर तक्रारदार यांचे दोन मोबाईल पोलिस नाईक बाळासाहेब पानसरे यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. हा मोबाईल परत देण्यासाठी त्यांनी तक्रारदार यांच्याकडे ५० हजार रुपयांची मागणी केली होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारदार यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन पडताळणी केली. या पडताळणीअंती भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार पानसरे यांच्या विरोधात वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक भारत साळुंखे करत आहेत.