कळमनुरी बायपासजवळ भर रस्त्यातच 'बर्निंग टेम्पो'चा थरार; प्लायवूडसह टेम्पो जळून खाक (File Photo : Fire)
पिंपरी : पिंपरी-चिंचवड परिसरातील देहू-आळंदी रोडवर असलेल्या एका स्क्रॅप गोदामात मध्यरात्री एकच्या सुमारास भीषण आग लागली. या गोदामात विविध स्क्रॅप साहित्य, प्लास्टिक आणि लोखंडी वस्तू मोठ्या प्रमाणात होत्या. त्यामुळे आग जास्त प्रमाणात वाढत गेली असल्याचे सांगितले जाते. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाकडून आग विझण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले.
देहू-आळंदी रोडवरील स्क्रॅप गोदामाला ही आग लागली. बुधवारी मध्यरात्री एकच्या सुमारास ही दुर्घटना घडली. यामध्ये विविध स्क्रॅप साहित्य, प्लास्टिक आणि लोखंडी वस्तू मोठ्या प्रमाणात असल्याने त्याचेही आगीमुळे मोठे नुकसान झाले. गोदामाला लागलेली ही आग तब्बल तीन ते चार तासांनी आटोक्यात आणण्यात आली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, गोदामातील साहित्याचे मोठे नुकसान झाले असून, आगीचे कारण अस्पष्ट आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मुंबईतील बॅकारोझ परफ्यूम्स आणि ब्युटी प्रॉडक्ट्स, इंटरक्राफ्ट ट्रेडिंग आणि फ्रॅग्रन्स शॉप्स या कंपन्यांच्या गोदामांना भीषण आग लागली होती. या आगीत मोठ्या प्रमाणात नुकसानही झाले होते. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, ही आग आटोक्यात आणण्यासाठी तब्बल 8 तासांपेक्षा जास्त वेळ लागले होते. त्यानंतर ही आग विझवण्यात यश आले.
पुण्यातील वारजेत सिलेंडरचा स्फोट
पुणे शहरातील वारजे भागात गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. या भीषण स्फोटात दोघांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती आहे. हा स्फोट इतका भीषण होता की, यामध्ये मोठी आगही लागली होती. स्फोटानंतर लागलेल्या आगीत संपूर्ण घर जळून खाक झाले. बुधवारी (दि.9) रात्री दोनच्या सुमारास हा स्फोट झाला.