नवी मुंबईत इमारतीला भीषण आग (फोटो- सोशल मिडिया)
नवी मुंबईतील बिल्डिंगला भीषण आग 4 जणांचा मृत्यू
बहुमजली इमारतीला लागलेल्या आगीत 10 जण जखमी
तातडीने बचावकार्याला झाली सुरूवात
नवी मुंबईमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. नवी मुंबईतील एका बहुमजली इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेत 4 जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. ज्यामध्ये महिला आणि 6 वर्षांच्या मुलीचा देखील समावेश असल्याचे समजते आहे. तर 10 जण जखमी झाले आहेत.
नवी मुंबईमधील एका बहुमजली इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या आगीचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. 10 व्या मजल्याला आग लागल्याचे समोर आले आहे. ही आग 12 व्या मजल्यापर्यंत जाऊन पोहोचली.
आगीची तीव्रता इतकी भयानक होती की अनेक जण त्या घटनेत जखमी झाले आहेत. तर 4 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 6 वर्षांच्या मुलीचा समावेश असल्याचे म्हटले जात आहे. तर यामध्ये 10 जण जखमी झाले आहेत. आगीत जखमी झालेल्या लोकांना रूग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.
#NaviMumbai | वाशी इथल्या एमजी कॉम्प्लेक्समधील रहेजा रेसिडेन्सीच्या १० व्या मजल्यावर लागलेल्या आगीत ४ जणांचा मृत्यू, तर १० जण जखमी झाले आहेत. ♦️ जखमींवर वाशी इथल्या एमजीएम रुग्णालय आणि फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरू आहेत.#NaviMumbaiFire #FireSafety pic.twitter.com/GhchNhAl2q — AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) October 21, 2025
आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अथक प्रयत्न केल्यावर आग विझवण्यात यश आले आहे. आग कशामुळे लागली याचे कारण समजू शकलेले नाही. या घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे.
विमानात लिथियम बॅटरीचा स्फोट
एका प्रवाशाच्या बॅगमधील लिथियम बॅटरीला आग लागल्याने चीनमधील एका फ्लाइटमध्ये मोठी खळबळ माजली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. ही घटना चीनमधील हांग्झूहून सोलला जाणाऱ्या एअर चायना फ्लाइट CA139 मध्ये १८ ऑक्टोबर रोजी सकाळी घडली.
विमान सकाळी ९:४७ वाजता निघाले होते. दरम्यान, विमानातील वरच्या बाजूच्या सामानाच्या डब्यातून अचानक धूर आणि ज्वाळा निघू लागल्या. एका प्रवाशाच्या कॅरी-ऑन बॅगमधील लिथियम बॅटरीला आग लागल्याचे स्पष्ट झाले. आग लागल्याचे पाहताच प्रवाशांमध्ये मोठी घबराट पसरली आणि ते ओरडत पळू लागले. विमान परिचारिकांनी (Cabin Crew) तातडीने परिस्थिती नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला आणि अग्निशामक यंत्रांच्या मदतीने आग विझवली. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी विमानाला तातडीने शांघाय पुडोंग विमानतळावर आपत्कालीन लँडिंग (Emergency Landing) करावे लागले.