मुंबई : मुंबई महापालिकेत (BMC) 112 हजार कोटींची अनियमतिता झाल्याचा ठपका कॅगनं (CAG) ठेवल्यानंतर, या प्रकरणाची एसआयमीर्फत चौकशी करण्याचे आदेश दोन दिवसांपूर्वीच शिंदे सरकारनं (Shinde Government) दिले. त्यावरुन राजकारण तापलेलं असतानाच आता कोविड सेंटर घोटाळा प्रकरणात आज मुंबई महापालिकेचे तत्कालीन अधिकारी आणि ठाकरे गटाच्या निकटवर्तीयांवर आज ईडीनं छापेमारी केलीय.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला अडचणीत आणण्याचा हा प्रयत्न आहे का? असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येतोय. मुंबई महापालिका जिंकण्याची जय्यत तयारी भाजपाकडून सुरु आहे. मात्र, उद्धव ठाकरेंबाबत असलेली सहानभूतीची लाट आणि ठाकरे गटाची मुंबईत मजबूत संघटनात्मक बांधणी यामुळं मुंबई महापालिका निवडणूक चुरसीची होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत ठाकरे गटाच्या 25 वर्षांच्या राजवटती मुंबई महापालिकेत किती मोठा भ्रष्टाचार झाला, हे दाखवण्याचा आणि जनतेपर्यंत तो पोहचवण्याचा शिंदे-फडणवीस सरकारचा हा प्रयत्न असल्याचं दिसतंय.
12 हजार कोटींच्या अनियमिततेची होणार एसआयटी चौकशी
मुंबई महापालिकेच्या एका वर्षाच्या कारभाराची चौकशी कॅगच्या वतीनं करण्यात आली होती. त्यात 12 हजार कोटींची अनियमितता झाल्याचा अहवाल देण्यात आला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात यातल्या काही महत्त्वाच्या बाबी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ठेवल्या होत्या. त्यानंतर या प्रकरणाची एसआयचटी चौकशी करण्याची मागणी भाजपा आमदार अमित साटम यांनी केली होती. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला या प्रकरणाची एसायटी चौकशी करण्याचं फडणवीस यांनी जाहीर केलंय. मुंबई महापालिकेच्या तोंडावर ही चौकशी होणार असल्यानं, ठाकरे गट अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.
ठाकरे गट आक्रमक, 1 जुलैला मोर्चा
12 हजार कोटींच्या अनियमितता प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश सरकारनं दिल्यानंतर ठाकरे गटही आक्रमक झाला आहे. मुंबई महापालिकेच्या गेल्या वर्षभराच्या प्रशासकीय राजवटीत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय, याविरोधात 1 जुलैला मुंबीत मोर्चा काढणार असल्याचं त्यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या दुसऱ्या दिवशी जाहीर केलंय. या संघर्षात शिंदे- भाजपाच्या काळात मोठा भ्रष्टाचार झाल्याचं मुंबईकरांच्या मनावर बिंबवण्याचा ठाकरेंचा प्रयत्न दिसतोय.
मोर्चाच्या घोषणेनंतर 24 तासांत कोविड प्रकरणात छापेमारी
ठाकरे गटाकडून मोर्चाची घोषणा करण्यात आल्यानंतर 24 तासांच्या आतच ईडीकडून मुंबई महापालिकेतील कोविड घोटाळा प्रकरणात मुंबईत 15 ठिकाणी छापेमारी केली आहे. त्यात मुंबई महापालिकेचे तत्कालीन अधिकारी, ठाकरे गटाचे पदाधिकारी यांचा समावेश आहे. आधी एसआयटी चौकशी आणि त्यानंतर करण्यात आलेली ही ईडीची छापेमारी यातून विरोधकांना निष्प्रभ करण्याचा हा प्रयत्न असल्याचं मानण्यात येतंय.
ठाकरे गटाकडे गल्या 25 वर्षआंपासून मुंबई महापालिका आहे. त्यात कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचं मतदारांपर्यंत नेण्याचा शिंदे गट आणि भाजपाचा प्रयत्न दिसतोय. आता या सगळ्याला ठाकरे गट किती आक्रमकपणे उत्तर देतो, यावरुन पुढची चुरस रंगणार आहे.