पुणे ग्रॅंड टूरमध्ये आजोबांचा जलवा! वय ७० पार पण जिद्द मात्र २० वर्षाच्या तरुणाला लाजवेल अशी, VIDEO VIRAL (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
होय या स्पर्धेत आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर तरुणांना लाजवेल अशा उत्साहात एका पुणेरी आजोबांनी सहभाग घेतला आहे. या आजोबांचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या स्पर्धेतील स्पर्धक हाय-टेक सायकली, प्रोफेशन गिअर्सच्या सायकली घेऊन उतरले असताना, या आजोबांनी आपल्या सायकलवर स्वार होऊन लोकांचे लक्ष वेधले आहे. आजोबांचा उत्साह पाहून लोक चकित झाले आहे. स्पर्धाकांनीकडूनही त्यांचे कौतुक होत आहे. आजोबांनी दाखवून दिले आहे की, वय तर केवळ आकडा असतो, तुम्ही इच्छाशक्ती प्रबळ असेल तर तुम्ही हवं ते साध्य करु शकता.
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
आजोबांचा सायकलिंग करतानाचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुफान व्हायरल होत आहे. आजोबांची जिद्द, उत्साह, स्फूर्ती पाहून लोकांनी त्यांचे कौतुक केले आहे. सुमारे ४७३ किलोमीटरच्या या स्पर्धेत मुळशी, मावळ, सिंहगड आणि बारामची अशा कठीण मार्गाचा सावेश आहे. पण हे आव्हानं आजोबांनी स्वाकारले आहे. नेटकऱ्यांनी त्यांचे कौतुक करत International आप्पा, आप्पाचा विषय लई हार्ड आहे …., आजोबाला फुल सपोर्ट, आप्पा सगळ्यांना कोलून पुढे, आता बाबांची चर्चा होणार इंटरनॅटिनल मॅगझीन मध्ये… अशा प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






