धुळे : काजू समजून चंद्रज्योतीच्या बिया (Jatropha) खाल्ल्यामुळे 7 चिमुरड्यांची प्रकृती बिघडली आहे. धुळे (Dhule) तालुक्यातील बोरकुंड गावातील आदिवासी वस्तीत लहान बालकांनी खेळता खेळता काजू समजून चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्याने हा दुर्दैवी प्रकार घडला आहे. विषबाधा (Food Poisoning) झालेल्या सर्व चिमुरड्यांवर शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहेत.
काजू समजून चंद्रज्योती या फळाच्या बिया खाल्ल्यामुळे 7 मुलांची प्रकृती अस्वस्थ झाल्याची घटना काल धुळे तालुक्यातील बोरकुंड गावात घडली. घराजवळ खेळत असताना मुलांना चंद्रज्योतच्या झाडाखाली पडलेल्या बिया दिसल्या. खेळता खेळता काजू समजून मुलांनी या विषारी बिया खाल्ल्या. या बिया खाल्ल्यानंतर काही वेळातच त्या मुलांना अस्वस्थ वाटू लागले. मुलांना मळमळ आणि उलटीचा त्रास सुरु झाला. मुलांची प्रकृती खालावल्याने पालकांनी त्यांना तातडीने शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केलं. यातील एका मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याने तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. बिया खाल्ल्यानंतर 6 मुलं बेशुद्ध झाली असून त्यांच्यावर सध्या बाल रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे, मात्र त्यांना देखील त्रास होत असल्याने त्यांना 24 तास देखरेखीखाली ठेवण्यात येणार असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.
[read_also content=”वरुण धवन आणि जान्हवी कपूरच्या ‘बवाल’ची रिलीज डेट अचानक ढकलली पुढे,नक्की झालं तरी काय ? https://www.navarashtra.com/entertainment/varun-dhawan-and-janhvi-kapoor-starrer-bawaal-movie-release-date-changed-nrsr-366973/”]
चंद्रज्योतीच्या बिया
सामान्यपणे चंद्रज्योती, रतनज्योत किंवा रान एरंड म्हणून ओळखले जाणारे जेट्रोफा ही दक्षिणेकडील भागात आढळणारी एक सदाहरीत वनस्पती आहे. पूर्वीपासून औषधी उपयोगासाठी या चंद्रज्योतीचा वापर होत आला आहे. अलिकडे जैविक-इंधन म्हणूनही त्याला प्रोत्साहन देण्यात आले होते.
रस्ताच्या कडेला किंवा शाळेच्या परिसरात झुडुपांसारख्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या या वनस्पतीची फळं दिसायला खूप आकर्षक असतात. परंतु चंद्रज्योतीचे फळ किंवा बिया खाल्ल्याने लहान मुलांना विषबाधा होत असल्याचे प्रकार फारसे कधी समोर आले नाही. मात्र काजुच्या बिया समजून लहान मुलं या बिया फोडून खात असल्याचं बऱ्याचदा पाहायला मिळालं आहे. फळ खाल्यानंतर लहान मुलांना वारंवार उलट्या, ओटी-पोटात वेदना होतात, तोंडातून फेस येतो, असे म्हटले जाते.