File Photo : Death
ब्रह्मपुरी : चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथे एक दुर्दैवी घटना घडल्याचे समोर आले. याठिकाणी विहिरीतील मोटारपंपाची केबल टाकताना विजेचा जबर धक्का लागून चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. ही घटना ब्रह्मपुरी तालुक्यातील गणेशपूर (मेंडकी) येथे बुधवारी सकाळी घडली. या घटनेनंतर गावात एकच शोककळा पसरली.
हेदेखील वाचा : भाजपच्याच कार्यकर्त्याने दाखल केली भाजप खासदाराविरोधात पोलिसांत तक्रार; त्याचं कारण…
पुंडलिक मानकर (वय 65), प्रकाश खुशाल राऊत (वय 50) नानाजी पुंडलिक राऊत (वय 60 तिघे रा. चिचखेडा), युवराज झिंगर डोंगरे (50 रा. गणेशपूर) अशी मृतांची नावे आहेत. तर सचिन नन्नावरे हा गंभीर जखमी आहे. चिचखेडा आणि गणेशपूर येथील पाच शेतकरी बुधवारी सकाळी एका शेतातील विहिरीतील मोटारपंपाचे केबल टाकण्यासाठी गेले. यावेळी अचानक तुटलेल्या केबलचा संपर्क विहिरीतील पाण्याशी आला. त्यामुळे पाचही शेतकऱ्यांना विजेचा जबर धक्का बसला.
या प्रकरणाची माहिती पोलीस आणि विद्युत विभागाला देण्यात आली. त्यानंतर सर्वांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, यात चौघांचा मृत्यू झाला आणि दोन जणांवर उपचार सुरू आहेत. या शेताजवळ जंगल असून, वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी येथे टाकलेल्या विद्युत तारेमुळे किंवा विजेच्या खांबावरून तुटलेल्या तारेमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.
शेतात टाकायला गेले होते खत
ब्रम्हपुरी तालुक्यातील गणेशपूर (मेंडकी) येथील असल्याची माहिती आहे. मृतांमध्ये गणेशपूर येथील पुंडलिक मानकर, प्रकाश राऊत, युवराज डोंगरे व नानाजी राऊत यांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. वन्य प्राण्यांनी शेताची नासधूस केली होती. त्यानंतर कूंपन घालण्यासोबत शेतात खत टाकालया हे शेतकरी गेले होते. नेमकं त्याचदरम्यान ही दुर्घटना घडली.
हेदेखील वाचा : ‘येऊ नको म्हटलं तरी कोणत्या गाडीत बसू अशी अवस्था’; अजित पवारांना पुन्हा डिवचलं