फोटो - सोशल मीडिया
पटना : गेल्या काही दिवसांपासून राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. त्यात आता एका भाजप कार्यकर्त्याने भाजपच्याच खासदाराविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. भाजप आमदार मिश्रीलाल यादव यांचे समर्थक असलेल्या अखिलेश राय यांनी भाजप खासदार गोपाल जी. ठाकूर आणि भाजप मंडल अध्यक्ष माधव झा आझाद यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली आहे.
हेदेखील वाचा : ‘राहुल गांधी हे परकीय मानसिकतेलाच धार्जिणे आहेत…,’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सडकून टीका
5 सप्टेंबर रोजी केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा तारडीह ब्लॉकमध्ये बांधलेल्या सीएचसीचे ऑनलाईन उद्घाटन करत होते. त्याचवेळी आपापल्या नेत्यांचे श्रेय घेण्यावरून खासदार आणि आमदार समर्थकांमध्ये वाद झाला. हे प्रकरण इतके वाढले की, दोन्ही नेत्यांमध्ये हाणामारी झाली. आता या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होऊ लागला. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एफआयआरमध्ये खासदार गोपाल जी ठाकूर यांच्या सांगण्यावरून पूर्वनियोजित कटाचा भाग म्हणून हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
भाजप खासदारावर हल्ला केल्याचा आरोप
सीएचसीच्या उद्घाटनावेळी स्वत: श्रेय घेण्यासाठी जोरदार हाणामारी झाली. यामध्ये व्हीआयपी पक्षाचे कार्यकारिणी सदस्य अखिलेश राय गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी डीएमसीएचमध्ये दाखल करण्यात आले. पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये अखिलेश राय यांनी काही गंभीर आरोप केले आहेत.
काय म्हटलंय तक्रारीत?
जेव्हा ते सीएचसीच्या उद्घाटनासाठी लोकांना आमंत्रित करत होते. यावेळी काकोडा चौकात भाजप मंडल अध्यक्ष माधव झा आझाद यांना शिवीगाळ व मारहाण केली होती. त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी चाकू काढून माझ्या हातावर हल्ला केला. त्यामुळे माझे एक बोट कापले गेले. मी गंभीर जखमी झालो. भाजप खासदार गोपाल जी ठाकूर यांच्या सांगण्यावरून हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप अखिलेश राय यांनी केला आहे.
हेही वाचा: मलायका अरोरावर कोसळला दु:खाचा डोंगर, वडीलांनी तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून संपवले जीवन