मुंबई : मंगळवारी रात्री भाजप (BJP) नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांची भेट घेतली आहे. त्यानंतर राजकीय घडामोडींनी वेग घेतला असून राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी पत्र पाठवले आहे. तसेच, विधीमंडळ सचिवांनाही (Legislature Secretary) पत्र पाठवले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे आता महाविकास आघाडी (MVA) सुप्रीम कोर्टात (Supreme Court) धाव घेण्याची शक्यता आहे. सरकारला ३० जून रोजी बहुमत चाचणीला सामोरे जावे लागणार आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर (Rebellion) आता अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. आज या सत्तासंघर्षाचा नववा दिवस आहे. मंगळवारी, भाजपच्या गोटातून मोठ्या घडामोडी घडल्या. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिल्ली भाजप श्रेष्ठींची भेट घेतल्यानंतर रात्री मुंबईत राज्यपालांची त्यांनी भेट घेतली. सरकारने बहुमत गमावले असल्याचा दावा त्यांनी केला.