मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी मुंबई शहराबाबत वादग्रस्त विधान (Controversial Statement About Mumbai) केले होते. त्यांच्या या विधानामुळे राज्यात तीव्र राजकीय पडसाद उमटत आहेत. या विधानावर आता विरोधी पक्षातील नेत्यांकडून प्रतिक्रिया येत असून राज्य सरकारनेही केंद्राकडे तक्रार करणार असल्याचे म्हटले आहे. तर, भाजप (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी समर्थन केले आहे.
मा. राज्यपालांकडून कोणाचा ही अपमान झालेला नाही..
त्यांनी फक्त त्या-त्या समाजाला त्यांच्या योगदानाचे श्रेय दिले आहे..
त्यांच्या विरोधात बोलणाऱ्यांनी..किती मराठी माणसांना मोठे किंवा श्रीमंत केले?किती मराठी तरुणांना bmc चे contract दिले?तेव्हा तुम्हाला शाह आणि अग्रवाल पाहीजे असतात..— nitesh rane (@NiteshNRane) July 30, 2022
आमदार नितेश राणे ट्वीटमध्ये म्हणतात की, त्या त्या समाजाला त्यांच्या योगदानाचे श्रेय दिले पाहिजे, राज्यपाल यांनी वक्तव्यातून हेच स्पष्ट केले आहे. राज्यपालांकडून कोणाचाही अपमान झालेला नाही, त्यांनी त्या त्या समाजाला योगदानाचे श्रेय दिले आहे. त्यांच्याविरोधात बोलणाऱ्यांनी मराठी माणसाला आणि तरुणांना किती मोठे केले हे स्पष्ट करावे, असेही त्यांनी म्हटले आहे.
एवढेच कशाला .. तुमच्या पक्षप्रमुखांनी आपले सगळे पैसे आणि प्रॉपर्टी नंदकिशोर चतुर्वेदी कडे देऊन ठेवली आहे ते चालत का ? तेव्हा मराठी माणूस आठवला नाही ??
— nitesh rane (@NiteshNRane) July 30, 2022
सत्तेत असताना महाविकास आघाडी सरकारने (MVA) किती मराठी तरुणांना मुंबई महापालिकेचे कंत्राट (BMC Contract) दिले? तेव्हा तुम्हाला शाह आणि अग्रवाल पाहिजे असतात. एवढेच कशाला शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुखांनी आपले सगळे पैसे आणि प्रॉपर्टी नंदकिशोर चतुर्वेदीकडे देऊन ठेवली आहे ते चालत का? तेव्हा मराठी माणूस आठवला नाही का?, असा सवालही त्यांनी केला आहे.