मंचर : आंबेगाव तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी सर्व्हर डाउन असल्यामुळे उमेदवारांची दमछाक होत आहे व फॉर्म भरण्याची प्रक्रिया संथ आहे. त्यामुळे ऑफलाईन पर्याय म्हणून मुदत वाढ मिळावी,अशी आंबेगाव तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सरचिटणीस डॉ. सुहास कहडणे यांनी पुणे जिल्हाधिकार्याकडे केली आहे.
जिल्हाधिकार्याना पाठविलेल्या पत्रात डॉ. सुहास कहडणे यांनी म्हटले आहे की, जाती जमातीच्या उमेदवारांना आधी जातपडताळणीसाठी ऑनलाईन फॉर्म भरावा लागतो. नंतर तहसील मधून शिफारस पत्र घेऊन फॉर्म जात पडताळणी विभाग येरवडा कार्यालयात जमा करून ती पावती घेऊन नंतर उमेदवारी अर्ज ऑनलाईन भरून प्रिंट घेऊन दाखल करावा लागतो. त्यासाठी खूप वेळ लागतो सर्व्हर डाउन असल्यामुळे जात पडताळणी फॉर्म च भरला जात नाही .त्यात अर्ज भरण्याची शेवटची मुदत शुक्रवार दि.२ रोजी आहे. त्यामुळे सदर बाबींची दखल घेऊन अर्ज जमा करण्यासाठी मुदत वाढ मिळावी अशी मागणी करत आहेत.