देहूरोड : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त देहूरोड शहर शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) आणि युवा सेनेच्यावतीने ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
मेन बाजारातील सुभाष चौकात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रथम शिवस्मारकमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास विलास हिनुकले, सुरेश मुळे यांनी पुष्पहार अर्पण केला व नंतर नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्यास राष्ट्रवादीचे माजी, अध्यक्ष मिक्की कोचर व मेहबानसिंग तक्की यांनी पुष्पहार अर्पण केला. सुभाष चौकात ळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला मावळ तालुका समन्वयक रमेश जाधव यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी शिवसेना महिला आघाडी शहर संघटीका सुनंदा आवळे, माजी उप तालुका प्रमुख बबनराव पाटोळे, युवासेना मावळ तालुका उपआधिकारी विशाल दांगट, माजी शहरप्रमुख राजेश शेलार, उप शहरप्रमुख संदीप बालघरे, विभागप्रमुख विजय थोरी, मनसे नेते मोजस दास, शशिकांत सप्पागुरू, गणेश सावंत, अमित पिंजण, सत्यभामा खोल्लम, बाळासाहेब पिंजण, चैतन सोनवणे आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. रमेश जाधव यांनी मार्गदर्शन केले. सुनंदा आवळे यांनी आभार मानले.