मुंबई : अंधेरी मुंबई येथे २९ जुलै रोजी चौकाच्या नामकरणाच्या वेळी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी केलेल्या भाषणासंदर्भात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट (Role Clear) केली आहे. “मुंबई-महाराष्ट्राचा स्वाभिमान (Pride Of Mumbai-Maharashtra) तर आहेच. शिवाय ती देशाची आर्थिक राजधानीसुद्धा (Mumbai Finacial Capital) आहे. छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) आणि मराठी माणसाच्या या भूमीत राज्यपाल म्हणून मला सेवेची संधी मिळाली, याचा मला अभिमानच आहे. त्याचमुळे अतिशय अल्पावधीत मराठी भाषा (Marathi Language) अवगत करण्याचा मी प्रयत्न केला, असे त्यांनी म्हटले आहे.
राजस्थानी समाजाच्या कार्यक्रमात काल मी जे विधान केले त्यात मराठी माणसाला कमी लेखण्याचा माझा कुठलाही हेतू नव्हता. केवळ गुजराती आणि राजस्थानी मंडळांनी व्यवसायात दिलेल्या योगदानावर मी बोललो. मराठी माणसांनीच कष्ट करून महाराष्ट्राला उभे केले. म्हणूनच आज अनेक मराठी उद्योजक नावाजलेले आहेत. ते केवळ महाराष्ट्रात नाही, तर भारतात आणि जगभरात मोठ्या दिमाखात मराठीचा झेंडा रोवून आहेत. त्यामुळे मराठी माणसाचे योगदान कमी लेखण्याचा कुठे प्रश्नच निर्माण होत नाही, असे राज्यपाल म्हणाले.
नेहमीप्रमाणे माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. महाराष्ट्राच्या उभारणीत मराठी माणसाच्या कष्टाचे योगदान सर्वाधिक आहेच. अलीकडे प्रत्येक बाबतीत राजकीय चष्म्यातून बघण्याची दृष्टी विकसित झाली आहे, ती आपल्याला बदलावी लागेल. एका समाजाचे कौतुक हा दुसऱ्या समाजाचा अपमान कधीही नसतो. कारण नसताना राजकीय पक्षांनी त्यावर वाद निर्माण करू नये. किमान माझ्या हातून तरी मराठी माणसाचा अवमान कधीही होणार नाही. विविध जाती, समुदाय यांनी नटलेल्या या मराठी भूमीच्या प्रगतीत, विकासात सर्वांचेच योगदान आहे आणि त्यातही मराठी माणसाचे योगदान अधिक आहे, असे राज्यपाल कोश्यारी यांनी नमूद केले आहे.