भिगवण : ऊस कारखाने चालू झाल्यामुळे परजिल्ह्यातून आलेल्या ऊस तोड कामगारांच्या आरोग्याचा विचार करून जिल्हा परिषद पुणे व तक्रारवाडी उपकेंद्र यांच्या सहाय्याने रोटरी क्लब भिगवन तर्फे ऊसतोड मजुरांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. यामध्ये रक्तदाब, रक्तातील साखरेची तपासणी करून त्यांना औषधे देण्यात आली.
यावेळी रोटरी क्लब भिगवनचे अध्यक्ष डॉ. अमोल खानावरे, सेक्रेटरी वैशाली बोगावत, तक्रारवाडी उपकेंद्रच्या डॉ. मृदुला जगताप, सचिन बोगावत, संजय खाडे, औदुंबर हुलगे, तुषार क्षिरसागर, जावेद शेख तसेच अमोल वाघ उपस्थित होते.
[blockquote content=”सध्या ऊसतोड कामगारांचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आहे. दिवसभरच्या ऊस तोडीमुळे त्यांना स्वतःच्या आरोग्याकडे तसेच कुटुंबातील लहान मुले, वयस्कर माणसे व महिलांच्या आरोग्याकडे लक्ष देणे होत नाही. याचीच दखल घेऊन ऊसतोड कामगारांच्या फडावर जाऊन त्यांची तपासणी करून मोफत औषधोपचार केले.” pic=”” name=”- डॉ. अमोल खानावरे, अध्यक्ष, रोटरी क्लब ऑफ भिगवण.”]
आरोग्य केंद्रातर्फे आरोग्य तपासणी मोहीम सुरु
डॉ. मृदुला जगताप म्हणाल्या, जिल्हा परिषद पुणे अंतर्गत ऊसतोड कामगार आरोग्य तपासणी मोहीम चालू आहे. येथे महिलांमधील सर्व आजारांची तपासणी करून तसेच गर्भवती मातांची व लहान मुलांची तपासणी करून त्यांना समुपदेशन करून हिमोग्लोबिन, रक्तगट तपासून औषधोपचार करण्यात आले.






